आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाण हवी. राजु धावंजेवार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सामान्य जनतेवर होणारे अन्याय कधीही खपवून घेतले जाणार नाही. परंतु सामान्य जनतेनेसुध्दा आपल्या हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची जाण ठेवणे देखील गरजेचे आहे. तसेच प्रत्येक नागरीकाने जागृत राहण्याची गरज आहे. असे प्रतिपादन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केले. 
घटनेतील विविध कलमान्वये प्रत्येक व्यक्तीला समतेचा, स्वातंत्र्याचा व्यवसाय करण्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आल्याचे सांगितले. मानवाधिकार दिनाच्या निमित्याने आज विश्रामगृहात पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली यावेळी मानवी हकक सुरक्षा परिषदेचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते. 


आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाण हवी. राजु धावंजेवार आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाण हवी. राजु धावंजेवार Reviewed by सह्याद्री चौफेर on December 10, 2024 Rating: 5
Powered by Blogger.