वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार- कॉ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌




सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : नुकत्याच विधानसभा निवडणुका आटोपल्या,पैशाच्या पुरात सर्वजन वाहत‌ असतांनाही भाकपच्या गावशाखा कार्यकर्त्यांनी निष्ठेने व जाणीवेने विळा उंबईवर मतदान‌ केले हे भाकपची‌‌ जमेची‌ बाजु आहे. ज्यामध्ये राजुर काॅ.ईजारा 58, पळसोनी मुर्धोणी 55, गणेशपुर 22, मुकुटबन 64, मेंढोली 35, चिखलगाव 26, वागदरा 20, लालगुडा 20, मोहर्ली 23, पाटण 27, अर्धवण 17, झरी जामणी 39, साखरा दरा 36, वेळाबाई 33, घोन्सा 32, भालर 31, नांदेपेरा 148, कुंभा 103, बोटोणी 37, वेगाव 29, कोसारा‌ 30, माथार्जुन 40, शिबला 27, रांगणा 14, नरसाळा 40, बोरगाव 80, रासा 30, जुणोनी 69, मुळगव्हाण‌ 43 आणि अन्य‌ गावातील मतदारांचा व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

राज्य कौंसिलने नुकतेच शाखा परिषदा ‍घेण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयानुसार कॉ.अनिल हेपट हे स्वतः शाखा परिषदांना उपस्थित राहून मतदारांचे आभार माणुन शाखा कौंसिलची पुर्नबांधणी करणार आहेत.त्याअगोदर सर्व बुथप्रमुखांचा व ज्यांनी प्रचारयंत्रणा सांभाळली अशा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये येणाऱ्या जि.प.पं.स.निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी त्यांचे त्यांचे गावात कधी शाखा परिषद घेणार ती तारिख लवकरात लवकर कळवावे,असे जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे यांनी आवाहन केले आहे.
वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार- कॉ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌ वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार- कॉ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌ Reviewed by सह्याद्री चौफेर on December 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.