सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : अनुगामी लोकराज्य महाभियान अनुलोम भाग वणी च्या वतीने सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी येथील शेतकरी मंदिराच्या सभागृहात अनुलोम मित्र मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्याला संबोधित करताना आ.बोदकुरवार यांनी म्हणाले की, अनुलोम संस्थेचे उद्देश म्हणजे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम अनुलोमच्या माध्यमांतून केले जाते. प्रगतशील समाजापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न अनुलोम करित असून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम अनुलोम मित्र करतो आहे,असेही त्यांनी सांगितलं. तर इतरही मान्यवरांनी अनुलोम मित्र परिवाराचं कौतुक केलं.
वणीत अनुलोम मेळावा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2024
Rating: