सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : अकोला, नागपूर, राळेगाव,चंद्रपूर यासह ग्रामीण भागात पुर्वी पासून चालु असलेली एस.टी. बससेवा महामंडळाने बस अभावी बंद केली. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी वणी आगार यांना एका निवेदनद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारात बसेसचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे घुग्घूस-कोरपना-गडचांदूर व शिंदोला या परिसरातील ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत असून खासगी वाहणाकडून आर्थिक लूटही होत आहे. सदर बस फेऱ्या सुरु करावी, अशी मागणी नांदेकर यांनी केली. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्याना शाळा सुटल्यानंतर घरी जायला उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय तासंतास एसटी ची वाट पाहावी लागत आहे. याचा फायदा खासगी वाहने घेत असून मनमानी कारभार करतात ही गोष्ट सोमवारी माजी आमदार विश्वास नांदेकर यांना समजल्यानंतर त्यांनी बसस्थानकात जाऊन ई-बस रोखली. दरम्यान, आगार प्रमुखांशी चर्चा करून सर्व विद्यार्थ्यांना ई-बसमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकले.
वणी आगाराला जिल्ह्याधिकारी यांनी नवीन एसटी बस उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा शिवसेना विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल, असा ईशारा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी दिला आहे.
यावेळी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, उप तालुका प्रमुख मोरोपंत पोतराजे, विजय ठाकरे, विजय गेडाम, नरेंद्र बखल, संदीप थेरे, अनिल आसुटकर, विशाल आवारी, राजू झाडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण डोहे, शिवराम चिडे, सुवास दरवेकर, अमोल चिकनकर, तेजस भगत, किशोर किनाके, हेमंत पत्रकार, महिला आघाडी संघटिका सीमा वारी, भाग्यश्री वैद्य, मनीषा कोंगरे, पौर्णिमा राजुरकर, स्वाती झाडे, सोनू डावरे, रंजना मोरे, निलिमा डाके, यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
निवेदन: अतिरिक्त बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी ; विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होत आहे गैरसोय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2024
Rating: