सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पायल गौरव उरकुडे (वय 21) असे या गळफास घेतलेल्या विवाहीतेचे नाव आहे. दि.30 सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवाहितेने घरी कुणी नसतांना घराच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून जगाचा निरोप घेतला. कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर पायल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
पायल हिचा एक वर्षापूर्वी गौरव उरकुडे या तरुणाशी प्रेम विवाह झाला होता. अशातच ती सात महिन्यांची गर्भवती राहिली. तिने ममतेचा गळा घोटून मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. घरी कुणी नसतांना विवाहित तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
सदर घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. गरोदरपणात असलेल्या तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
गळफास लावून नवविवाहितेची आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 01, 2024
Rating: