सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : भगिनींनो घाबरण्याचं कारण नाही, कारण देवेंद्रजी उर्फ देवाभाऊ तुमच्या आमच्या पाठीशी आहेत, लाडकी बहीण योजना ही कायम असणार आहे, आज समाधान आहे सरकार आपलं आहे, अशा आणखीन योजना भविष्यात आपल्याला भाजप सरकार देतील,असे प्रतिपादन प्रदेश महामंत्री भाजप महिला मोर्चाच्या अलका आत्राम यांनी केले.
मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल मध्ये आयोजित नारीशक्ती मेळावा समारंभात त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मारेगाव तालुकाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा ता. अध्यक्ष शालिनी दारुण्डे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा नक्षीने,जिल्हा सचिव सुनीता पांढरे, संध्या अवताडे, किसान चे दिनकर पावडे, भाजपा चे नितीन रासेकर, ता.अध्यक्ष अविनाश लांबट, सुशीला भादीकर, संध्या लोडे, सुनीता नेपलवार, रजू कुरेशी, पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कोणत्याही आमिषास बळी न पडता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात अनेक योजना राबविण्यात येत आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. गरिबी काय असते हे मला चांगल माहितीये, कारण गरिबीतून मी याठिकाणी आलेली आहे. महिलांना सन्मानजनक वागणूक दिली जात असेल तर फक्त आणि फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टी मध्ये. भाजपा मध्ये महिलांना ताई म्हटलं जातं आणि इतर पक्षात वहिनी म्हणून बोललं जातं यावरून त्यांची मानसिकता काय आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपलं सरकार शेतकरी, विद्यार्थी, कामगार, गरोदर माता यांनाही योजना राबविण्यात येते. आज तुम्ही माझ्या माता भगिनीं ताई इतक्या मोठ्या संख्येने या मेळाव्यात आल्या याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रदेश महामंत्री अलका आत्राम यांनी सांगितले. विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सरकार आणि मी तुमच्या पाठीशी आहे. कुठलंही कामे असुद्या एकदा या भावाला सांगा भेटा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या भावाला शुभेच्छा दिल्या व दहा वर्ष प्रेम केलं, आणि असेच पुढेही असुद्या असे गौरोद्गार त्यांनी काढले. तसेच जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी विरोधाकावर निशाणा साधत म्हणाले आमच्या माता बहिणी व मुलीवर जर कोणी अश्या वाईट जनरेने पाहील त्यांचे "ऐनकाउंटर" च होतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा नक्षीने, प्रास्ताविक सुनीता पांढरे तर आभार प्रदर्शन शालिनी दारुण्डे यांनी केले. या प्रसंगी भाजपचे मंगेश देशपांडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, प्रसाद ढवस, गणेश झाडे, सुनील देऊळकर, सूर्यभान ठोबरे, पवन ढवस, गंगाधर कुंटावार, राहुल राठोड, यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, मदतनीस तसेच शेकडो महिला व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या, यावेळी कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मारेगाव येथे नारीशक्ती मेळावा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2024
Rating: