सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरातील राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट वित्तीय संस्थांकडे पार्किंगची व्यवस्था नाही, जवळपास सर्वच संस्था शहराच्या मुख्य रस्त्यालगत आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांचे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर पार्क करतात, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. परिणामी अशा वित्तीय संस्थांना चालवण्यास परवानगी देवू नये, असे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शहरातील संस्थांचे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर उभी करून तासंतास संस्थांमध्ये घालवतात, त्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे. सहकारी बँका, पतसंस्था आणि मल्टीस्टेट वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना पार्किंगची सुविधा देत नाहीत. रस्ते पार्किंग प्लेस बनल्याने याकडे संबंधित विभागाने या लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी युवासेने च्या वतीने करण्यात आली.
यावेळी सुरेश शेंडे, तेजस नागपुरे, आर्या राऊत, बादल येसेकर, रुद्राक्ष सिडाम, श्री चौधरी, चैतन्य लोडे, निकेश कडुकर, निरज घागी, श्री बदखल, मशिष मंदे यासह युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रीच्या दिवसांत त्रास वाढेल
नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहेत. त्यानंतर दिवाळी येत आहे. या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. नवरात्रीच्या दिवसात रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नागरिकांना वाहनांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेने संबंधित बँकेला कळवून पार्किंगची व्यवस्था करावी. तसेच ज्या संस्थांमध्ये पार्किंगची सुविधा नाही अशा संस्थांना परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रस्ते बनले पार्किंग प्लेस ; युवासेनेची कारवाईची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2024
Rating: