सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी विधानसभा मतदार संघात आदिवासी समाज आपला स्वतंत्र प्रतिनिधी निवडून आणू शकतो एवढे मतदान विधानसभेत आहेत. परंतु असे न करता, वेळप्रसंगी प्रस्तापित पक्षांना सरसकट मतदान करून आपल्या सामाजिक समस्या, प्रश्न सोडवतील म्हणून आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी कायम आहे. परंतु आजतागायत कोणत्याही पक्षाने नेतृत्व करण्याची संधी न दिल्याने हा आदिवासी समाज मात्र, आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. असे असताना राज्यात गैरआदिवासीची घुसखोरी व बोगस आदिवासीचे प्रमाण वाढत चालल्याने त्यांनाच आपले लोकप्रतिनिधी समजून समाजाला न्याय देतील, म्हणून वणी येथे रविवारी एक आदिवासी सामाजिक न्याय संसदेचे आयोजन करण्यात आले.
या संसदेला खासदार आमदार व मंत्र्यांना मान देऊन त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आले, त्यांनी आदरपूर्वक निमंत्रण स्वीकारलं हेही तितकंच सत्य आहे. न्याय व हक्कासाठी समाज बांधवानी महिनाभर जीवाचे रान करून संसद आयोजित केली. मात्र ऐन कार्यक्रमाच्या दिवशी आमंत्रित मान्यवरांनी या न्याय संसदेला दांडी मारल्याने समस्त आदिवासी समाजात या खासदार, आमदार व मंत्र्याच्याबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. या आदिवासी सामाजिक न्याय संसदेत यवतमाळ जिल्ह्यातील पारधी, कोलाम, गोंड, आंध, परधान जमातीतील बहुसंख्य लोक सहभागी झाले होते. येत्या निवडणुकीत सरंजामशाही, भांडवलशाही धार्जिणे तसेच धर्मांध, संविधान विरोधी,आरक्षणविरोधी पक्षाना आता आदिवासी समुदाय हा राजकीय व्यवस्था बदलण्याच्या संग्रामात उतरला असल्याने हा समाज आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे या संसदेचे मुख्य संयोजक गीत घोष यांनी या प्रसंगी आपल्या भावना प्रास्ताविकेतून व्यक्त केल्या आहे.
विविध पक्षाच्या दिग्गज नेत्यांना या न्याय संसदेत पाचारण करून आमच्या समाजाच्या समस्या प्रश्न शासन दरबारी मांडणार की नाही, किंबहुना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देणार की नाही अशी या संसदेमागची प्रमुख भूमिका होती. त्यातूनच खासदार प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर लोकसभा), ना. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, खासदार डॉ.नामदार किरसान (लोकसभा गडचिरोली क्षेत्र),आ. डॉ. अशोक उईके (राळेगाव विधानसभा क्षेत्र),आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्र,आ. डॉ. संदीप धुर्वे (केळापूर विधानसभा क्षेत्र), आ. सुभाष धोटे, (राजुरा विधानसभा क्षेत्र), आ. किशोर जोरगेवार (चंद्रपूर विधानसभा क्षेत्र) यांना सन्मानाने बोलावण्यात आले परंतु त्यांनी जाणूनबुजून पाठ फिरविल्याची चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात सुरू आहे.
जनतेचे आणि आदिवासी समाजाचे प्रगल्भ असलेल्या जिल्ह्यातील मान्यवरांना या न्याय संसदेत जराही येण्याची तसदी घेतली नसल्याने आदिवासी समाजात मोठा असंतोष पसरला असून कुरघोडीचे राजकारण उफाळून आले आहे. पक्षाच्या सभा असो की शासकीय कार्यक्रम, यामध्ये येण्याची ते नेते कोणतीच कसर सोडत नाहीत. मात्र आदिवासी समाज जेव्हा आपला न्याय हक्काची दाद मागण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, हे त्यावेळी कुरघोडी करीत आहेत. वणी येथील आदिवासी बांधवानी जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्या, प्रश्ना चे निराकरण करण्यासाठी रविवारी (ता.२९) रोजी संसद घेतली. मात्र, या संसदेला ला लोकप्रतिनिधीनी पाठ फिरविली असतांनाही सदर संसदीय कार्यक्रम आदिवासी विचारवंत यांचे उपस्थित यशस्वीरीत्या पार पडला. या संसदेचे अध्यक्ष मा उत्तमराव गेडाम, उद्घाटक मधुकरजी गेडाम माजी तहसीलदार, स्वागताध्यक्ष डॉ. संचीताताई नगराळे, प्रमुख पाहुणे रामचंद्र आत्राम, रामदासजी गेडाम, राहूल आत्राम, पुष्पाताई आत्राम, होमदेव कनाके, हे होते व त्यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले. या संसदेचे प्रास्ताविक गीत घोष यांनी केले, सूत्रसंचालन ॲड अरविंद सिडाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसंत चांदेकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता अध्यक्ष उत्तमराव गेडाम, कार्याध्यक्ष पुष्पा आत्राम, सचिव अॅड अरविंद सिडाम, उपाध्यक्ष राहुल आत्राम, रामदास गेडाम, प्रकाश घोसले संयोजक गीत घोष, भाऊराव आत्राम, वसंतराव चांदेकर, संतोष पेंदोर, कुमारअमोल कुमरे, महेश आत्राम, विकास पंधरे, रमेश मडावी, प्रशांत डोनेकर, श्रीकृष्ण मडावी, अशोक नागभिडकर, मारोती आत्राम, रामकृष्ण सिडाम, सचिन मेश्राम, आदिवासी सामाजिक न्याय परिषदेच्या सर्व पदाधिकारी सभासद तसेच आदिवासी समाज बांधवांनी प्रयत्न केले.
एकीकडे जनतेचे प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत तळमळीने मांडणाऱ्या खासदार, आमदारांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. खासदार धानोरकर, आमदार बोदकुरवार, व वनमंत्री मुनगंटीवार संसदेला न आल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस ला जागा दाखवणार असल्याची चर्चा यानिमित्ताने वणी विधानसभा मतदार संघात रंगतांना दिसत आहे.
वणीत आदिवासिंच्या सामाजिक 'न्याय संसदे'ला खासदार-आमदारांनी फिरवली पाठ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 02, 2024
Rating: