भाऊ हरले, ताई जिंकल्या...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्रीय व कॅबिनेट मंत्र्याना पराभूत करण्याची परंपरा ही धानोरकर कुटूंबीयाची राहिलेली आहे. 16 व्या फेरीत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा 2 लाख 4 हजार 300 एवढं मताधिक्य घेवून विजयाच्या मार्गाने निघालेल्या इंडिया, महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांनी ही परंपरा कायम राखली आहे. मंत्र्यांचा पराभव करण्याची धानोरकर कुटूंबाची परंपरा व इतिहास पुन्हा कायम राखला गेला आहे अशी प्रतिक्रिया आमदार धानोरकर यांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केली.
आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 सकाळी 8 वाजता पासून पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणीला सुरूवात झाली. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्याच फेरीत मुनगंटीवार यांच्यावर दहा हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी प्रत्येक फेरीत वाढत गेली.

एक लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दिड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील मोठे नेते असून त्यांना राजकारणाचा 30 ते 40 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणे साधे नव्हते. 
आतापर्यंत लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो धानोरकर कुटूंबियांनी थेट मंत्र्यांना पराभूत केल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या विधानसभा निवडणूकीत स्व. बाळू धानोरकर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवितांना तेव्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा काँग्रेस उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणूकीत स्व.खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी थेट केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत केले होते.

मोदी लाटेत राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर हे निवडून आले होते. तसेच विधानसभा निवडणूकीत वरोरा मतदार संघात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माजी मंत्री संजय देवतळे यांचा पराभव करीत निवडून आल्या आहेत. तर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आ. प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन म्हणजे 7 लाख 18 हजार 410 अशी एकूण मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मिळालेली मते 4,58,004 अशी आहे.
त्यामुळे धानोरकर कुटूंबियांनी मंत्र्यांना पराभूत केल्याची हॅट्रीक साधली जात आहे. स्व. बाळू धानोरकर व आ. प्रतिभा धानोरकर कुटूंबियांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत मंत्र्यांचा पराभव केल्याचा इतिहास या विजयाने कायम राखल्या गेल्याचे मत आ. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी भाऊंची आठवण करून देत या निवडणूक आणि भरघोस मताधिक्य संदर्भात विचारणा केली असता आ. धानोरकर म्हणाल्या की, आज स्व. खासदार बाळू धानोकर शरीराने आपल्या सोबत नसले तरी, त्यांचे विचार व मनाने ते आपल्या सोबत आहे. त्यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात उतरविली. त्यामुळे हा विजय संपादन करता आला. माझा विजय हा निश्चितच होता. परंतु इतक्या मताधिक्याने विजय होईल याबाबत खात्री नव्हती. मात्र, एक ते दिड लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा दावाही धानोरकर यांनी यावेळी केला. हा विजय माझ्या एकटीचा नसून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा हा विजय असल्याचे त्या म्हणाल्या.
भाऊ हरले, ताई जिंकल्या... भाऊ हरले, ताई जिंकल्या... Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.