मनीषा तिरणकर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

सह्याद्री चौफेर : कुमार अमोल 
     
यवतमाळ : येथील सामाजिक चळवळीच्या नेत्या सौ. मनीषा वसंतराव तिरणकर यांना एकता सेवाभावी संस्था,महाराष्ट्रच्या वतीने मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे भव्य आयोजित कार्यक्रमात, समाजरत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. 

हा पुरस्कार मा.ना.अनिल पाटील, मदत पुनर्वसन मंञी, मा.ना.संजयजी बनसोडे क्रिडामंञी, मा.प्रताप देशमुख माजी महापौर, सुप्रसिद्ध संगीतकार मा. दिलीपजी सेन, प्रा. डाॅ. अशोक जोंधळे, अरुण मराठे, अजमत खान यांच्या ऊपस्थित देण्यात आला. अखंड भारत, राष्ट्रनिर्मिती, समाज निर्मितीतील मानवी सेवा इत्यादी कार्यासाठीच्या ऊद्येशाने समाजरत्न पुरस्काराने मनीष तिरणकर ह्या सन्मानित झाल्यात.
    
सौ.तिरणकर ह्या अ.भा.महिला संविधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्षा, महाराष्ट्र राज्य नॅशनल चाईल्ड एंड वुमन डेव्हलपमेंट कौन्सील न्यू दिल्ली व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र राज्य, नॅशनल एन्टी करप्शन एंड आपरेशन कमिटी ऑफ ईंडिया जिल्हाध्यक्ष यवतमाळ, भारतीय नारी रक्षा संघटना, यवतमाळ अश्या विविध सामाजिक संघटनेच्या पद भुषवीत आहेत. आदिवासी आणि बहुजन समाजात त्यांचे सामाजिक अलौकिक कार्य असुन त्यांनी समाजातील पिडीत महीलांना न्याय मिळवुन देण्यासाठी निर्भिड भुमिकेने कार्य चालविले. 

समाज ऊत्थानासाठी चळवळीची महीला परिषद, पोलीस बांधवांच्या हक्कासाठी पुढाकार घेत असत. मनिषा तिरणकर यांनी मानवी हक्काची झेप घेवुन "स्त्री" ही राजकारणात सशक्त व्हावी म्हणुन श्रीमंत बलाढ्य शक्तिंच्या विरोधात नगराध्यपदाची निवडणुक लढविली. त्यांच्या संघर्षाच्या जीवनाचा हा समाजरत्न पुरस्कार असुन त्यांचेवर सर्वञ अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post