टॉप बातम्या

शामादादा कोलाम संघटना यवतमाळच्या कार्यकर्त्यांची कळंब-दत्तापूर येथे बैठक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना यवतमाळ जिल्ह्याची बैठक दिनांक 24 ला कळंब तालुक्यातील दत्त निरंजन माहूर दत्तपूरात जिल्हा अध्यक्ष राहुल आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मा. धाबेकर साहेब, पंडीत घोटेकर, मा. राड्रॉ साहेब, मा.सुरेश मुंडाली, मा गुजाराम दादा, श्री. चांदेकर साहेब, कोलाम समाजाचे जेष्ठ परमपूज्य मोकशे महाराज, समाजसेवक हरिभाऊ रामपुरे, हभप लोणसावले महाराज (सालेभट्टी), श्री.अंकुश कासारकार, श्री. दिलीप मलांडे, श्री. ईश्वर दादा (शा. को. घा ता. अ) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत येणाऱ्या 1 ऑगस्ट 2024 ला शामा दादा कोलाम यांची जयंती निमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासह राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम शामदादा यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

सन 1990 पासून कोलाम समाजातील तीन व्यक्तींनी निवडणूक लढविली होती, त्यांना मिळालेली मते व समाज कुठे मागे पडतो आणि आता काय करायला पाहिजे याबाबत विस्तृत चर्चा झाली, समाज एकजूट असेल आणि आर्थिक भांडवल कमी असले तरी निवडणूक लढवता येत असा मौलिक मंत्र बैठकीत मांडण्यात आला. चांदेकर साहेब यांनी सन 1992 ला लढवलेली निवडणूक आणि त्यातील गोडकडू अनुभव विषद केली. उमेदवार कसा असावा यावर मार्गदर्शन करण्यात आले, जयंती निमित्ताने समाजाने एकत्रित राहण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मलांडे तर आभार प्रदर्शन अंकुश गाडेकर यांनी मानले. या आयोजित बैठकीला मारेगाव,कळंब, राळेगाव व घाटंजी तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post