फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचारांवर, विकासात्मक, विधायक पत्रकारीतेचे काम करणारे "माणिक कांबळे"

अभिष्टचिंतन | वाढदिवस 

मारेगाव तालुक्यातील विधी सेवा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार क्षेत्रातील चळवळीतील ज्येष्ठ लढवय्ये पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे माणिकभाऊ कांबळे यांचा आज दि. १९ मे रोजी वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!

माणिकराव कांबळे यांनी आपल्या निर्भीड लिखाणातून प्रशासनाला जागे केले आहे.व कामे करण्यासाठी भाग पाडले आहे. "विकासासाठी सर्वांसोबत” हे ब्रीद वाक्य स्विकारून सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन विधायक कार्य करण्यासाठी प्रेरित करून प्रोत्साहन निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे, अशी भावना माणिकराव कांबळे वारंवार व्यक्त करतात हे विशेष. 

फुले, शाहू, आंबेडकर, यांच्या विचारांवर, विकासात्मक, विधायक पत्रकारीतेचे काम करणारे, कांबळे यांनी स्वता: मध्ये कधीही अहंकार बाळगलेला नाही.सर्वांच्या चांगल्या कार्यात सहभागी होणे हा त्याचा स्वभाव गुणविशेष आहे. सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करून ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते कृर्तत्वान, अष्टपैलू, शांत मनमिळाऊ स्वभावाचे पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत. यापुढेही त्यांच्याकडून शैक्षणिक, सामाजिक,व निर्भिडपणे पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडून यशस्वी व्हावेत या अभिष्टचिंतनासोबत माणिकरावजी कांबळे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिकाकडे प्रार्थना…

तसेच मारेगाव व परिसरातील पत्रकारीतेच्या चळवळीतील एकमेव जेष्ठ लढवय्ये पत्रकार असणारे माणिक कांबळे यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!!

शुभेच्छुक :- प्रेस संपादक व पत्रकार संघ तालुका मारेगाव