सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : किराणामाल पोहोचवून व जुनी वसुली घेऊन शहराकडे परत येताना भर रस्त्यात अडवून नौकरांना मारहाण केली आणि वसुलीचे 80 हजार 700 रुपये व 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना गुरुवारी 16 मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजता दरम्यान घडली, या घटनेची वणी पोलिसात तक्रार नोंद करून लुटारू विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) रस्त्यावर जनता शाळेच्या पुढे दोन मोटारसायकल वर आलेल्या इसमानी तीनचाकी ऑटो वाहन अडवून चालकाचा सहकारी लक्ष्मण मेश्राम याला मारहाण केली. त्याला मारहाण करित असल्याने चालक जितेंद्र रिंगोले यांनी विरोध केला असता अज्ञात इसमानी त्यालाही मारहाण केली व त्यांच्या जवळ असलेली पैशाची बॅग व लक्ष्मण याचा मोबाईल घेऊन मोटारसायकल वर बसून ते रफुचक्कर झाले. या घटनेने तालुक्यात लुटपात, खून, चोऱ्या, दरोडा सारख्या घटनेने पुन्हा डोकं वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर घडलेल्या घटनेची तक्रार वणी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. यात मारहाण व किराणा मालाची वसुलीचे 80 हजार 700 रुपये व 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल असे एकूण 88,700 रुपयाची लूट झाल्याचे गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे. राजेश रिंगोले याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम 394 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी येथील व्यावसायिक राजेश तारुणा यांचे वाहेगुरू किराणा भंडार दुकान आहे. ते ग्रामीण भागात छोट्या छोट्या दुकानदारांना किराणा मालाचा पुरवठा करतात, गुरुवारी त्यांचे अॅपे नावाचे तीन चाकी वाहनात किराणामाल भरून वाहन चालक जितेंद्र इंगळे हा घोंसा, रासा, दहेगाव येथे त्याला पाठविले होते. त्याच्या मदतीला लक्ष्मण मेश्राम हा सहकारी होता. त्यांना मारहाण व पैसे लुटल्याची घटनेने व्यावसायिकात दहशत पसरली आहे.