टॉप बातम्या

"त्या" चौकीदाराचा खून करणारे आरोपी अखेर जेरबंद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील सिमेंट व सळाख व्यावसायिक खिवंसरा यांच्याकडे चौकीदार म्हणून काम करणाऱ्या चौकीदार याची अज्ञात लोकांनी निर्दयीपणे खून केला व गोडावून मधील सलाखीचे बंडल चोरून नेले होते, त्या घटनेचा तब्बल १८ दिवसानंतर छळा लागला आहे. आरोपी कारंजा लाड (जि. वासीम) येथील असून त्यांना अटक करण्यात आली. या कामगिरीने पोलीस प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

पोलीस माहितीनुसार वणी पोलीस स्टेशन येथे दिनांक २९/४/२०२४ रोजी फिर्यादी नामे सुरेश मोतीलालजी खिवंसरा (वय ६३) व्यवसाय बिल्डींग मटेरियल सप्लायर्स रा. रविनगर (वणी) यांनी जबानी रिपोर्ट दिला की, दिनांक २८/०४/२०२४ चे सांयकाळी ०६/०० वा.ते दिनांक २९/०४/२०२४ चे सकाळी ०८/१५ वा.चे सुमारास त्यांचे मालकीचे योगेश ट्रेडर्स या नावाने सिमेंट, स्टिलचे गोडावूनमध्ये कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी करण्याचे उद्देशाने येवुन लोखंडी सळाखीचे चार बंडल वजन अंदाजे २४० किलो किं. अंदाजे १४०००/- रुपयांचा चोरुन नेले व गोडावून वर चौकीदार म्हणून काम करीत असलेले जिवन विठ्ठल झाडे (वय अंदाजे ६० वर्ष) रा. आष्टोणा ता. राळेगांव यास डोक्यावर व उजव्या खांद्यावर कुठल्यातरी हत्याराने जबर मारहाण करुन जिवानिशी ठार मारले अशा फि.चे जबानी रिपोर्ट वरुन पो.स्टे. वणी येथे अपराध क्रमांक ४३२/२०२४ कलम ३०२,३९४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासावर घेण्यात आला होता.

सदर प्रकरणाचे घटनास्थळी अज्ञात आरोपीतांनी कोणताही पुरावा सोडलेला नव्हता तसेच घटनास्थळ हे रोडपासुन अंतर १०० मिटर अंतरावरील व मोकळी जागा असल्याने, तसेच सदर परिसरात लावण्यात आलेले CCTV कॅमेरे सुध्दा बंद अवस्थेत असल्याने गुन्हयाचे तपासकामी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नव्हता, त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. त्याकरीता मा. जिल्हा पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता दिशा निर्देश दिले होते त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी वणी हे स्वतः प्रकरणाचे तपासावर बारकाईने लक्ष ठेवून होते तसेच ठाणेदार पो.स्टे. वणी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरीता ०५ विशेष पथके तयार केली होती सर्व पथकांनी घटनास्थळ ते मारेगांव, नांदेपेरा रोड, मुकूटबन रोड, ग्राम पडसोनी तसेच वरोरा, घुग्घुस, शिरपुर, यवतमाळ या रोडवरील जवळपास १०० पेक्षा अधिक CCTV फुटेज प्राप्त करुन त्याची सविस्तर बारकाईने पाहणी केली असता काही CCTV फुटेज मध्ये घटनेवेळी एक मालवाहु वाहन संशयीतरित्या फिरत आढळुन आले. व सदर वाहनातील व्यक्तींची हालचाल सुध्दा संशयास्पद असल्याचे दिसुन आल्याने नमुद संशयीत वाहनाचा शोध घेत असतांना दिनांक १४/०५/२०२४ रोजी सदरचे वाहन वणी परिसरामध्ये आढळुन आले. नमुद वाहन व CCTV फुटेज मधील वाहनाचे मिळते जुळते असल्याचे व तेच गुन्हयातील वाहन असल्याचे व ते टाटा कंपनीचे इन्ट्रा वाहन क्रमांक (एम एच ३७ टी २८५६) हे असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहनावरील चालकास सविस्तर विचारपुस केली असता त्याने सदरचे वाहन नामे रज्जाक शाह रमजान शहा (वय ४५ वर्ष) रा. नुरनगर, कारंजा लाड जि. वाशीम याचे मालकीचे असल्याचे सांगीतल्याने प्रकरणाचे पुढील तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांनी स्वतः सदर ठिकाणी जावुन तपास केला असता नमुद घटनेवेळी सदर वाहनावर चालक म्हणुन १) अजीम शहा रमजान शहा (वय ३५) रा. नुरनगर, कलंदरी मस्जीद जवळ, कारंजा लाड ता. कारंजा जि. वाशीम, तसेच मदतनीस २) मोहमद उमर अब्दुल गणी (वय ३६) रा.वेवी सातपुरा, जुना सरकारी दवाखाना जवळ कारंजा लाड ता. कारंजा जि. वाशीम तसेच ३) वि.स. बालक हे वणी परिसरात सदरचे वाहन घेवुन आल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद इसमांना व विधी संघर्ष ग्रस्त बालकास अधिनस्त पथकाचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयाचे अनुषंगाने सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी कबुली दिली की, आरोपी क्रमांक १- अज्जु उर्फ अजीम शहा रमजान शहा याचा भंगार व जुने टायर खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय असल्याने ते दिनांक २८/०४/२०२४ रोजी नमुद साथीदारांसह वणी मध्ये आले होते. त्यांनी पडसोनी फाट्यावरील गोडावूनची सविस्तर पाहणी केली तेव्हा त्यांना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी सलाखी ठेवुन असल्याचे व त्या ठिकाणी एकच वृध्द इसम चौकीदार असल्याचे दिसुन आले, करीता त्यांनी पाहणी करुन लालपुलीया परिसरात गेले, सदर ठिकाणा वरुन त्यांनी रोडवरील दुकाना समोरुन जुन्या टायरची चोरी केली व परत सदरच्या घटनास्थळी आले व तिथे येवुन त्यांनी लोखंडी सलाखींची चोरी केली व त्या दरम्यान सदर ठिकाणावरील चौकीदार याला आरोपी इसम हे चोरी करीत असल्याचे दिसुन आल्याने व चौकीदारांनी त्यांना विरोध दर्शविल्याने नमुद आरोपीतांनी चौकीदाराचे डोक्यावर व बरगडीवर लोखंडी रॉडने वार करुन जागीच ठार केले. आणि घटनास्थळावरुन पळुन गेले. यातील आरोपी अज्जु उर्फ अजीम शहा रमजान शहा याचे विरुध्द पो.स्टे. कारंजा येथे गैरकायद्याची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न, अश्लील शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा, जिवे मारण्याची धमकी देणे,असे तिन तर नागपुर येथे कलम १२२ म.पो.का अन्वये एक गुन्हा नोंद आहे.

सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बनसोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात मा. गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि बलराम झाडोकार, धिरज गुल्हाणे, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडुरे, पोहेकॉ सुहास मंदावार, विकास धडसे, विजय वानखडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पोना/पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बानकर, निलेश निमकर, पोकों/शाम राठोड, विशाल गेडाम, मोहमंद वसीम, रितेश भोयर, अमोल नुन्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर सर्व पोलीस स्टेशन वणी यांनी केली आहे.
Previous Post Next Post