परत पुन्हा एका ट्रॅक्टर वर मध्यरात्री कारवाई


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात नदी - नाल्यांतून वाळू चोरी सुरू असतांना या तस्कराविरूध्द तहसीलदार ऊत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या महसूल पथकाने कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. 

यापुर्वी अनेक ट्रॅक्टर जप्त करून गुन्हा दाखल केल्यानंतर आता पुन्हा एका ट्रॅक्टरवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. मारेगाव तालुक्यातील बामर्डा-फेफरवाडा परिसरातून विना परवाना अवैध वाहतुक करतांना ट्रॅक्टर ताब्यात घेतला असुन वाहन चालक वाहन सोडून पळून गेला आहे. ही दबंग कारवाई तलाठी चैतन्यकुमार शिंगणे, सनी कुळमेथे व विकास मडावी यांनी शनिवारी च्या मध्यरात्री 1 वाजता केली.

मार्डी सर्कल मधील बामर्डा-फेफरवाडा-मच्छिन्द्रा परिसरात अंधाराचा फायदा घेत वाळू चोरून नेली जात होती याची कुणकुण पथकाला लागली होती. अशातच काल पथक पत्त्यावर असताना मध्यरात्री निळ्या रंगाचे विना नंबर एक ट्रॅक्टर सह ट्राली संशयास्पद वाहतूक करताना आढळून आला. त्याला महसूल पथकाने सिने स्टाईलने दिड ते दोन किलोमीटर पाठलाग करून पकडले. दरम्यान, आपल्या दिशेने कोणीतरी येत असल्याचे पाहून, वाहनचालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला अशी माहिती पथकाने दिली. 

कारवाई दरम्यान, पथकाची चांगलीच दमछाक झाली,गड्यात फसलेले ट्रॅक्टर काढतांना अर्धी बदरी वाळू खाली उतरवावी लागली त्यानंतर अर्ध्या बदरीवाळू सह ट्रॅक्टर ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई साठी मारेगाव तहसील कार्यालयाला आणण्यात आला. त्यामुळे मारेगाव महसूल विभागांच्या सततच्या कारवायामुळे वाळू तस्करांमध्ये चांगलीच दहशत पसरल्याचे चित्र आहे.
परत पुन्हा एका ट्रॅक्टर वर मध्यरात्री कारवाई परत पुन्हा एका ट्रॅक्टर वर मध्यरात्री कारवाई Reviewed by सह्याद्री चौफेर on May 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.