अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्याची लागली वाट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शासनाच्या लिलाव झालेल्या वाळू घाटावरुन क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहणे रस्त्यावरून भरधाव धावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची पुर्णपणे वाट लागली असुन नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. 

मारेगाव तालुक्यातुन वाहत असलेल्या वर्धा नदीवरील आपटी, कोसारा, व सावंगी वाळू घाट लिलाव झाला आहे. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलेली रेती वाहणे चोरट्या मार्गाने धावत आहे. त्यामुळे या रस्त्याची पुर्णपणे वाट लागली आहे. या रस्त्यावरून धावणारी वाळूची जड वाहतुक बंद करण्यात यावी अशा आशयाची मागणी करणारे निवेदन तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वर्धा नदी घाटावरील आपटी वाळू घाटावरुन आकापुर, चिंचाळा, वरुड, वनोजादेवी, गौराळा,या रस्त्यावरून वाळू घाटाचा लिलाव झाल्यापासुन सुसाट वेगाने वाळूची जड वाहतुक केली जात आहे. ही वाहतुक बंद करण्यात यावी यासाठी या मार्गावरील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी एक लेखी निवेदन मारेगावचे तहसीलदाराकडे सादर केले आहे. निवेदनामध्ये वनोजा देवी ते गौराळा हा ग्रामीण भागातील रस्ता जनतेच्या रेट्यामुळे मंजुर झाला असुन, यंदा तो डांबरीकरणा सह पुर्णत्वास आला आहे. मात्र, या रस्त्याची वजण सहन करण्याची क्षमता 20 टनापेक्षा कमी असताना 40 टणा पेक्षा अधिक क्षमतेची रेती भरलेली वाहणे रात्र दिवस धावत आहे. त्यामुळे हा रस्ता उखडला असुन वाहतुक धारकांना या रस्त्यावरून वाहणे चालविणे जिकरीचे काम झाले आहे.त्यामुळे हा रस्त्यावरून धावणारी जड वाहतुक तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदना वर आकापुर सरपंच संदीप कारेकार, चिंचाळा पाथरी गटग्रामपंचायत उपसरपंच शशिकांत तावाडे, गौराळा ग्रामपंचायत सरपंच मयुरी चंद्रकांत धोबे, उपसरपंच अतुल गानफाडे यांच्या सह्या आहेत.
अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्याची लागली वाट अवजड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्याची लागली वाट Reviewed by सह्याद्री चौफेर on May 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.