रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार रोज मुंबईपर्यंत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोरोना काळात बंद ठेवण्यात आलेली नंदीग्राम एक्सप्रेस काल 7 मे 2024 पासून निरंतर सुरू होताच वणी रेल्वे प्लेटफार्म वर प्रवाशी आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र होते. 10 वाजता या वेळेवर नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे प्लेटफार्म वर पोहचली. आता ही रेल्वे बल्लारपूर-वणी-मनमाड, अशी ही नंदीग्राम शिवाजी महाराज टर्मिनल मुंबईपर्यंतच धावणार आहे. यासाठी केलेल्या पाठपुराव्याला माजी मंत्री हंसराज अहिर यांचे नागरिकांतून आभार मानले जात आहे.
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे ही बल्लारपूर-वणी-नांदेड-मनमाड-मुंबई,नंदीग्राम एक्सप्रेस ही रोज धावणार असून चंद्रपूर, वणी,नांदेड येथील प्रवाश्याना अतिशय सोयीची ही रेल्वे होणार आहे. वरील नमूद रेल्वे साठी आतुरतेने वाट पाहत असलेले प्रवाशी पुढील प्रवासासाठी उत्साही दिसून येत होती. त्याचे कारणही तसेच असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात होत की, कोरोनामुळे ही रेल्वे बंद करण्यात आलेली होती. बहुप्रतीक्षित ती पुन्हा नंदीग्राम एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्याने आनंद आहे. 
बल्लारपूर (बल्लारशहा) येथून रेल्वे सकाळी 8.30 सुटणार आहे. ही रेल्वे वणी येथे 10. वाजता पोहचणार. व 10 वाजून 10 मिनिटांनी मुंबई कडे प्रस्थान करेल अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे वणी उपविभागीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून आता रोज 7 मे पासून ही बहुप्रतीक्षेत रेल्वे वेळेवर धावणार आहे. 
रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार रोज मुंबईपर्यंत रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार रोज मुंबईपर्यंत Reviewed by सह्याद्री चौफेर on May 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.