सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ कला महा. राजूर कॉलरी येथे शिक्षण घेऊन परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत चिकाटीने व जिद्दीने कु. योगिनी रविंद्र सावळे हिने सरळ सेवा परीक्षेमध्ये यश मिळवून भूमीअभिलेख या विभागात नौकरी मिळवली. या प्रसंगी राऊत सर, मिलमिले सर, शेडमाके सर, दुर्गमवार मॅडम, यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना योगिनी रविंद्र सावळे चे मूर्तिमंत उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. प्राचार्य धानोकर सर यांनी यथोचित योगिनी सावळेचा गुणगौरव करून सत्कार केला.
आज 1 मे महाराष्ट्र दीन सत्काराने साजरा करण्यात आले. या अनुषंगाने विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.
१ मे महाराष्ट्र दीन सत्कराने साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2024
Rating: