सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
पांढरकवडा : दि. 28 एप्रिल रोजी कोलाम समाज संघटना तथा विवाह समिती जिल्हा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणा, मराठवाडा, विदर्भाची पावन भूमी श्री.जगदंबा माता संस्थान, केळापूर येथे सामूहिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यात कोलाम समाज रितिरिवाज प्रमाणे संस्थानच्या भव्य प्रांगणात मेळावा पार पडला. या सामूहिक विवाह मेळाव्यात 11 जोडपे विवाहबद्ध झाले.
या मेळाव्याकरिता लाभलेले प्रमुख पाहुणे विवाह मुहूर्त पूजन मा.श्री.सुभाष कासार (विदर्भ अध्यक्ष) आदिम जमात कोलाम समाज संघटना तसेच मा. श्री.निळकंठराव टेकाम साहेब,से.नि. नाने परीक्षण अधिकारी रिझर्व्ह बँक नागपूर मा.श्री.मधुकरराव घसाळकर साहेब से. नि. गट विकास अधिकारी मा.लक्ष्मणराव भिवनकर साहेब, मा.श्री सोनार साहेब.सहाय्यक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, मा.श्री.वामनराव ढोबळे सर से नि.मुख्याध्यापक पांढरकवडा, मा.श्री.रामदास टेकाम सर मुख्याध्यापक विवाह समितीचे अध्यक्ष, मा. माधव बी. टेकाम साहेब माजी सैनिक, सुभेदार मेजर मा.श्री तुकाराम आत्राम, माजी सरपंच विवाह समिती उपाध्यक्ष मा.श्री.आनंद मसराम साहेब, से.नि.माजी सैनिक विवाह कमिटी अध्यक्ष,श्री. आकाश आत्राम सचिव, श्री.उशेन आत्राम साहेब, श्री.रमेश आत्राम सर, श्री.जयवंत टेकाम सर, श्री.युवराज वरने साहेब, डॉ महादेव मुरझडी साहेब, डॉ.भगवान टेकाम साहेब, श्री. पोतू आत्राम साहेब, श्री.दिनकर कोंडेकर साहेब, श्री.कवडू सुरपाम गायक तसेच विवाह मेळावा करिता जिल्ह्यासह तालुक्यातील कर्मचारी वर्ग व पदाधिकारी साहेब सामाजिक कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी विवाहबद्ध झालेल्या 11 ही जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्यात आले.
केळापूर येथे कोलाम समाजाचा विवाह मेळावा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 01, 2024
Rating: