सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मौजे श्रीरामपूर गावाच्या शिवारात अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाजाच्या भूमिहीन लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले असून दरवर्षी खरीप हंगामात मशागत करून जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही सन 2024 च्या खरीप हंगामात पेरणी करणार आहेत. त्यामुळे कब्जात असलेल्या जमिनीवर पेरणी करण्याचे निर्देश द्या, असे आशयचे निवेदन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने मारेगाव तहसील कार्यालयाला देण्यात आले.
अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाज हा अत्यंत आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन नाही. रोजगाराची व्यवस्था नाही, त्यामुळे परिवाराच्या उदाहरनिर्वाहाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे म्हणून परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता एकमेव साधन म्हणून शेतीच्या अतिक्रमण आहे आणि ते शेतीचे अतिक्रमण जमीन सन 2024 च्या हंगामात पेरणी करणार असल्यामुळे पटवारी यांच्यामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियत 17 प्रमाणे वहीतीलायक जमिनीचा पंचनामा स्थळ निरीक्षण प्रत्यक्ष मोका पाहणी करून कोलाम समाजाच्या लोकांच्या कब्जात असलेले क्षेत्रफळांसहित अहवाल सादर करण्याचे निर्देश देणे बाबत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे शाखा श्रीरामपूर चे सदस्य भास्कर सुरपाम यांनी तहसीलदार उत्तम निलावाड यांना केली.
यावेळी तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर करताना गजानन रामपूरे, गोविंदा मेश्राम, रुपेश टेकाम, उद्धव मेश्राम, भाऊराव आत्राम, तुकाराम मडावी, तुळशीराम रामपुरे, गंगाराम आत्राम, रामदास आत्राम, सुरेश आत्राम, बोदलू मेश्राम, हुसेन आत्राम, चरणदास मेश्राम, सखाराम सुरपाम यांच्यासहित संघटनेचे ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम उपस्थित होते.