टॉप बातम्या

त्याच्या अज्ञाणपणाचा फायदा घेवुन फूस लावुन पळवून नेल्याची पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील जळका येथील स्व. लक्ष्मीबाई मोघे विद्यालय (जळका) येथे 9 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या युवकाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार काल मंगळवारी मारेगाव पोलिसात दाखल झाली. विद्यार्थी गायब झाल्यामुळे तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.

प्राप्त तक्रारीनुसार सविस्तर असे की, दिनांक 13/02/2024 दुपारी 11.वाजता च्या सुमारास फिर्यादी रोज प्रमाने बालगृह जळका येथे हजर असतांना श्लोक विनोद कडुकर (14) रा.बालगृह आज (मंगळवार) रोजी सकाळी आनंद बालसदन बालगृह जळका येथुन शाळेला गेला असता, अंदाजे 12.15 वा. दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक सुरेश नहाते (57) याचा मला फोन आला की, नामे श्लोक विनोद कडुकर हा शाळेमध्ये जंत तपासणी दरम्यान दिसुन आला नाही. दरम्यान,एक ते दीड तास पाहणी केली तरी,सुद्धा तो दिसुन आला नाही. त्यामुळे शाळेत हजर नसल्याचे सांगितले वरून फिर्यादी ने स्वत: हा व त्याचे सोबतचे सहकारी असे, ते आनंद बालसदन बालगृह जळका व शाळेतील परीसरात प्रथम शोधाशोध केली व नंतर आजुबाजुचे शेत परीसर तसेत पांढरदेवी अश्या ठिकाणी सुद्धा पाहणी केली असता, तो कुठेही मिळुन आला नाही. नंतर तक्रारकर्त्यांने त्याचे नातेवाईक मामा अशोक निंबालकर (34) रा. चिंचमंडळ यांना फोनवर झालेल्या प्रकाराबाबत माहीती सांगितली. त्यानी गावात विचारपुस केली परंतु तो मिळुन आला नाही.

त्याच्या अज्ञाणपणाचा फायदा घेवुन फूस लावुन कोणीतरी अज्ञात ईसमाने पळवुन नेले आहे. सदर अज्ञात ईसमावर योग्य कार्यवाही होणे करिता मारेगाव पोलिस स्टेशन ला जबानी रिपोर्ट देण्यात आला आहे. फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन प्रकरण तपासात घेतले.

कडुकर कुटुंबियाकडून भावनिक आर्तहाक घालीत मुलगा कुठे आढळून आल्यास 'श्लोक' ची माहिती देण्याची विनंती सह आवाहन करण्यात येत आहे. 
Previous Post Next Post