सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतून साकार होऊन दिनांक 6/2/2024 ला मारेगाव येथील जेष्ठ नागरिक सभागृहामध्ये महिला संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट होते, उद्घाटक सौ. ललिताताई संजीव रेड्डी बोदकुरवार होत्या, या कार्यक्रमांमध्ये उखाणे स्पर्धा, गायन स्पर्धा, उलटी गिनती स्पर्धा तसेच महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शालिनीताई दारुंडे यांनी केले, या कार्यक्रमाला उपस्थिती प्रशांत नांदे, दत्तू लाडसे, सुशीला भादीकर, सुनिता लालसरे, सुनीता जुमनाके, शेख अंजुम, छाया कनाके, माया बदकी तसेच मंदाताई जांभूळकर व इतर मान्यवर महिलांची होती.
कार्यक्रमाचे आयोजन शालिनीताई दारुंडे आणि मालाताई गौरकार यांनी केले आहे. संमेलन समारोपीय भाषण सौ. मालाताई गोरकार यांनी केले असून या संमेलन कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
मारेगाव येथे महिला संमेलनाचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 07, 2024
Rating: