टॉप बातम्या

'ती' याद देऊन गेली...उदय रायपुरे यांच्या शब्दात

'ती' याद देऊन गेली...

स्वप्नात येऊनी ती मजला भाव देऊनी गेली
जागवूनी झोपेतून मजला 'ती' याद देऊनी गेली...

गाढ झोपेत असता कसा जाग आला,
नजरेत पडलेल्या सावलीने काय सांगून गेली..

मनातील कल्पनेचा उजाळा देत होती
कळले नाही मजला ती काय सांगून गेली...

वेगळ्या दिशेने 'ती' वाहत चाललीय होती
उरले क्षण जीवनाचे काय बोलून गेली...

आहे नाते म्हणूनी मनाने 'ती' भारावून गेली होती
कंठ दाटून येई म्हणुनी ईशारा देऊन गेली...

सावरुनी उदय स्वतःला काय कल्पना होती
मनातील भावनेची वाट मोकळी करून गेली...

जागवूनी झोपेतून मजला 'ती' याद देऊनी गेली..

©® कवी - उदय रायपुरे
मु.पो.ता. मारेगाव,जि.यवतमाळ
संपर्क : 7020615358 
Previous Post Next Post