सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शिक्षक मागणीच्या संदर्भात 2 ते 3 वेळा निवेदन दिले परंतु शिक्षकाची पूर्तता करण्यात आलेली नाही. असा पालकांचा आरोप असून आज दिनांक 2/2/2024 रोजी विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती च्या प्रांगणात शाळा भरवून शिक्षकाची मागणी करण्यात आली. एका शिक्षकाची पूर्तता करून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी आग्रही मागणी पालकांची आहे. जानकाई (पोड) आदिवासी बहुल आदिम जमाती वास्तव्यास असून गटविकास अधिकारी शिक्षक देण्यास असमर्थ ठरत आहे.
सकाळपासून नुसती चर्चा सुरु असून शिक्षकाअभावी विद्यार्थी व पालक उघड्यावर पंचायत समिती च्या आवारात ठिय्या मांडून बसलेले आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा सुरु आहे. शिक्षक मिळाला नाही तर पंचायत समिती च्या शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबाबत पालक, सरपंच, गावकरी व विद्यार्थी उपोषणास बसणार आहे.
नियमित शिक्षक आणि स्वयमसेवक ह्या मागणीचा आम्ही लवकरच पूर्तता करू, तूर्तास पालकांनी पंचायत समिती च्या आवारात भरवलेली आजची शाळा मागे घ्यावे.-एस ए काटकरगट शिक्षण अधिकारी
संतापलेल्या पालकांनी भरवली पंचायत समिती च्या आवारात विद्यार्थ्यांची शाळा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 02, 2024
Rating: