टॉप बातम्या

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मुरलीधर बलकी यांची निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : जिल्हा परिषद प्राथ. शाळा महागांव या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मुरलीधर देवराव बलकी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अविनाश लांबट हे होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. एस. सातपुते यांनी केले.
शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय इतर सदस्यांची निवड करण्यात आली. सदर शाळेत गावातील विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात,त्यामुळे पालकातून शालेय व्यवस्थापन समितीची निवड नियुक्ती करण्यात आली.

समितीतील इतर सदस्य पुढील प्रमाणे-
अध्यक्ष मुरलीधर बलकी, सचिव डी.एस.सातपुते (मुख्याध्यापक), उपाध्यक्ष सौ.मंगला दूधकोहळे, सदस्य चंद्रभान आत्राम, सदस्य सौ योगिता वाकडकर, सदस्य दिपक वाकडकर, सदस्य सौ पुष्पा दर्वे, ग्राम. पं सदस्य अविनाश लांबट, विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य वाघाडे, विद्यार्थी प्रतिनिधी मयुरी ढोके आदींचा समावेश आहेत.
निवडीनंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मुरलीधर बलकी यांचा सत्कार उपसरपंच श्री.अविनाश लांबट, सौ.मंगला दुधकोहळे, गजानन लाबट,पंढरी लांबट, सौ.उषा ढेंगळे, सौ. रविना येरमे, सौ.रेखा आत्राम, सौ.चंदा मेश्राम, सौ. किरण ठोके, सौ.प्रतिभा गाडगे, सौ संगीता टेकाम, मिथुन येरमे, दिपक वाकडकर,विष्णू आत्राम, चंद्रभान आत्राम, गणेश खुसपुरे, महादेव मेश्राम, भालचंद्र ढंगळे, दिनेश वाघाडे, सुरेंद्र घोटेकार, सौ.वनमाला घोटेकार, सुदाम ढोरे, निखिल मिलमिले व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयम सेवक शिक्षक आत्राम सर यांनी आभार मानले.
Previous Post Next Post