महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर धजावण्यास का?पडतेय मागे...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : सध्या देशी दारू, मटका, जुगार हे अवैध धंदे मागे पडले आहेत. मारेगाव तालुक्यात रस्त्याच्या कडेला मोजमाप घेऊन दुकानदारी थाटली जात असून यात अवैध 'कोल डेपो' हा नवा उद्योग सध्या कोसारा परिसरात जोमात चालू आहे. यात जिल्ह्याबाहेरील व्यावसायिकांची भागीदारी असल्याची समजते.

मागील वर्षी काही संघटना पक्षांनी तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करून उपोषण करण्याचा ईशारा देखील दिला, तसेच लोकप्रतिनिधीने तर ठाणेदार यांना तंबीच देऊन, सांगितले की मारेगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करा. मात्र, एवढं होऊनही पाणी मुरतेय कुठे हेच कळायला मार्ग नसून आजतागायत कोसारा येथील ठाण मांडून असलेला कोल डेपो यावर कुठलीही कारवाई नाही. महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर कारवाई करण्यास का? मागे पडतेय...हा संशोधनाचा विषय असून तालुक्यात महापूर आलेल्या अवैध व्यवसाय का 'क्लोज' होत नाही हा चिंतनाचा विषय आहे. परंतु सगळे मूग गिळून गप्प आहे, असे चर्चील्या जात आहे.

आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या या मारेगाव तालुक्यात स्थानिक बेरोजगारांना हाताला काम नाही ही वास्तविकता आहे. मात्र आंतरजिल्ह्यातील लोकांना तालुक्यात प्रशासनाच्या नाकावर टिचून कोळशाची हेरगिरी करताहेत हे नवलच म्हणावं. 'खाकी'चा रुबाब थंडावला की काय अशी दबक्या आवाजात चर्चा असून यावर वेळीच लगाम लावला गेला नाहीतर उद्या ह्यांच्याच मुजोऱ्या वाढून परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तूर्तास मारेगाव तालुक्यातील कोल डेपो या अवैध व्यवसायाला "अच्छे दीन" आल्याची जोरदार चर्चा जनमाणसात जोर धरत आहे.
महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर धजावण्यास का?पडतेय मागे... महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पुढे; मात्र पोलीस प्रशासन कोल डेपोवर धजावण्यास का?पडतेय मागे... Reviewed by सह्याद्री चौफेर on January 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.