सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : मा. शरदचंद्र पवारजी साहेब, रा.काँ. पक्ष आढावा बैठक व पक्ष प्रवेश आज दि. १३. जाने.२०२४ रोजी वसंत जिनींग सभागृहात पार पडला. या बैठकीत मा.वर्षाताई निकम यवतमाळ जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी वणी तालुका व वणी शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन पक्षात नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये आबिद हुसेन जाहिद हुसेन, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, प्रदेश उपाध्यक्ष, खुशाल बासमवार वणी तालुका कार्याध्यक्ष, सौ. मेघाताई मसेवार महिला शहर अध्यक्ष, वणी , सय्यद शकिल सय्यद बशिर वणी शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष, कादिर अली जाकिर अली वणी तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष, अॅड. चंदु भगत वणी तालुका वकील सेल अध्यक्ष, अनिल थुल वणी तालुका सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष, नरेंद्र नाखले वणी शहर सामाजिक न्याय अध्यक्ष इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, नलिनीताई ठाकरे महिला जिल्हाध्यक्ष, संकेत टोणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष, विजय नगराळे सामाजीक न्याय जिल्हाध्यक्ष, सुर्यकांत खाडे वणी तालुका अध्यक्ष, विनोद ठेंगणे वणी शहर अध्यक्ष, रामकृष्ण वैद्य सरचिटणीस यवतमाळ जिल्हा, खुशाल बासमवार तालुका कार्याध्यक्ष, गुणवंत टोंगे ओबीसी सेल तालुका अध्यक्ष, श्रीकांत सरमोकदम वणी तालुका प्रसिध्दी प्रमुख, मनिषा नागतूरे, सुरेखा चांदेकर, पौर्णिमा येलकुंचवार, सुषमा उल्लेवार, सुधाकरराव काकडे (कवडशी), तुळशीराम ठाकरे (शिंदोला), विठ्ठल धांडे (नांदेपेरा), जगन खंडाळकर (वणी), समय्या कोंकटवार (राजुर), अविनाश चिकटे (नांदेपेरा), किशोर ठेंगणे (वणी), दिलीप गुंजेकार (वणी), दिनेश झाडे (बाबापूर), विजय बोधाने (बोर्डा), सुनिल ठाकूरवार (वणी). अजय अनपुरे (वणी), चेतन चौधरी (वणी), अनवर शेख (मंदर), अमर नगराळे (वणी), कृणाल गड्डीवार (वणी), अंकुश दुर्गे (वणी), मेघराज गेडाम (चारगांव), ओम टोंगे (वणी), चेतन चौधरी (वणी) यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
वणीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 14, 2024
Rating: