सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : वरिष्ठ केंद्रप्रमुखाने अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करून अपमानित केल्याने प्रभारी केंद्रप्रमुखांनी सामूहिक राजीनामा दिल्याने मारेगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यात १० केंद्रप्रमुखाची पदे आहेत यापैकी नऊ पदे प्रभारावर आहेत. यामध्ये बोटोणी केंद्र वगळता हिवरा मजरा, वरुड, मार्डी, चिंचमंडळ, कोलगाव, नवरगाव, मारेगाव, हटवांजरी, कुंभा केंद्र प्रभारावर आहेत. बोटोणी येथील पी. डी. रामटेके अधिकृत केंद्रप्रमुख यांनी अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याने प्रभारी केंद्रप्रमुखांनी सामूहिक राजीनामा ३ जानेवारीला दिला. यावेळी त्यांनी गटशिक्षणाधिकारी मारेगाव यांना दिलेल्या निवेदनात दि.१८ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन स्व. चिंधूजी पुरके प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मारेगाव येथे आयोजित करण्यात आले होते. सर्व प्रभारी केंद्रप्रमुखांनी तालुक्यातील शिक्षकाचे मदतीने चार दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धा व्यवस्थित व नियोजनाप्रमाणे पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली व क्रीडा सामने पार पाडले. चार दिवस चाललेल्या क्रीडा सामन्याचे ठिकाणी उद्घाटन कार्यक्रमा व्यतिरिक्त तालुकास्तरावरील एकही जबाबदार अधिकारी फिरकला नाही तरी प्रभारी केंद्रप्रमुखांनी जबाबदारीने सामने पार पाडले. मात्र, दि. २१ जानेवारी ला केंद्रप्रमुख बोटोणी श्री. पी. डी. रामटेके दुपारी १२.३० चे दरम्यान सामन्याचे ठिकाणी उपस्थित झाले. सर्व केंद्र प्रमुख व शिक्षक आपापली कामे जबाबदारीने पार पाडत होती. दुपारनंतर सर्व अंतिम सामने संपत आले होते. बोटोणी व नवरगाव केंद्रातील बोटोणी व रोहपट संघात अंतिम सामना सुरु होत असतांना कोणीतरी शिक्षकांने श्री. पी. डी. रामटेके यांना संघाचे हस्तांदोलन करण्यासाठी बोलावले असता. केंद्रप्रमुख श्री. पी. डी. रामटेके जाणिवपूर्वक अलाउन्स करणाऱ्या श्री. अशोक चटप, श्री. हेमराज कळंबे व सर्व केंद्रप्रमुख, जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना हरामखोर, चिल्लमतोंडे, साले अधिकाऱ्यासारखे वागते. मी दोन तासांपासून येथे येवून असून मला कोणी विचारत नाही. साले प्रभारी केंद्रप्रमुख स्वतःला साहेब समजते. अश्या अपमानास्पद शिव्या दिल्या. एक जबाबदार केंद्रप्रमुख कोणतीही जबाबदारी न घेता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रभारी केंद्रप्रमुख यांना विद्यार्थ्यांचे समोर अशी नीच भाषा वापरुन हरकत करतो. हा केंद्रप्रमुख स्वतःची जबाबदारी, कर्तव्य विसरुन मला मान द्या, मला खुर्ची द्या. त्यांच्यासाठीच उतावीळ झालेला असतो आम्ही प्रभारी केंद्रप्रमुख स्वतःचे वर्ग, मुख्याध्यापक पदाचा प्रभार सांभाळून प्रत्येक दिलेली जबाबदारी चोख सांभाळतो आणि यांचे कोणतेही कामे पूर्ण नसतात आणि विनाकारण खुर्ची साठी आम्हाला अपमानास्पद शिविगाळ करतो.
यापूर्वीही यांनी असेच वर्तन करुन एका प्रामाणिक व कर्तव्याची जाण ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विनाकारण आरोप करुन मानसिक त्रास दिला. ही व्यक्ती नेहमीच आम्हा प्रभारी केंद्रप्रमुखांना अपमानास्पद बोलत असतो तर कधी मोबाईल फोनवर अपमानास्पद बोलतो नेहमी आम्हाला यांची नियुक्ती कशी केली? एकाच संघटनेचे ७०% लोक घेतले यांची परीक्षा घेतली काय? अश्या वॉट्स अॅपवर वल्गणा करीत असतो. त्यामुळे आम्ही अश्या अपमानास्पद बोलणाऱ्या केंद्रप्रमुखांचा निषेध करतो आणि आम्ही आठही प्रभारी केंद्रप्रमुख आपापल्या प्रभारी केंद्रप्रमुख पदाचा सामुहिक राजीनामा सादर करीत असल्याचे नमूद केले आहे.
मारेगाव तालुक्यातील प्रभारी केंद्रप्रमुखांचा सामूहिक राजीनामा : वरिष्ठाकडून अपमानस्पद शिवीगाळ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 23, 2024
Rating: