सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : महाराष्ट्र ट्रायबल आघाडी च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सुमित सुनिलराव गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्टी चे मुख्य संघटक संतोषजी चांदेकर यांनी नियुक्ती पत्र देऊन श्री गेडाम यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
आदिवासींच्या न्याय हक्कासाठी व दिवासींची स्वतंत्र राजकीय व्यवस्था बळकट करण्यासाठी महाराष्ट्र ट्रायबल आघाडीची निर्मिती करण्यात आली असून, आदिवासींची वेगळी व्यवस्था या पक्ष्याच्या माध्यमातून निर्माण करायची आहे. त्यामुळे बुद्धिकौशल्य, राजकिय परिपक्तया, संघटन कौशल्य व लोकशाही मार्गान कायद्याच्या माध्यमातून जनसेवा, जनहित व राष्ट्रहित जोपासून महाराष्ट्र ट्रायबल आघाडी या पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात शहर तसेच ग्रामीण क्षेत्रांमध्ये घराघरांमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोहचण्यासाठी आपण अग्रेसर रहाल हिच अपेक्षा आहे,असे मत पक्षाचे संघटक श्री. चांदेकरजी यांनी व्यक्त केले.
यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो, पणमात्र आदिवासींचं एकही सक्षम नेतृत्व जिल्ह्यात बघावयास मिळत नाही, त्यामुळे आता महाराष्ट्र ट्रायबल आघाडी पक्ष्याच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व सुमित गेडाम यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याला मिळालं आहे. त्याचं पार्टीत स्वागत आहे,आगामी बैठकीत महाराष्ट्र ट्रायबल आघाडी पक्ष्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिकाधिक सार्थक रणनीती आखताना दिसतील अशी अपेक्षा मारेगाव तालुका अध्यक्ष अमोल कुमरे (महाराष्ट्र ट्रायबल आघाडी) यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या निवडी बद्दल नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री गेडाम यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र ट्रायबल आघाडीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सुमित गेडाम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 05, 2024
Rating: