सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील संविधान दिवस ते गणतंत्र दिवस याचे औचित्य साधून युवकांसाठी शिक्षण यात्रेचे आयोजन केले आहे.
सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांच प्रमाण अत्यल्प आहे. आजच्या पिढीतल्या युवकांचा प्रवास घर ते शिक्षण त्यानंतर नौकरी ते लग्न/कुटुंब. आजच्या युवकांना हे कुठ माहित आहे की, शिक्षणासोबतच सामाजिक कार्य करत राहील तर त्याच्या आधारावर परदेशातल्या विविध शिष्यवृत्ती मिळऊ शकतो. त्याचा फायदाही आपण घेऊ शकतो.
जागतिक स्पर्धेचा दृष्टीकोन युवकांमध्ये रुजवून ग्रामीण भागातील युवक देश विदेशात नामांकित विध्यापीठातून शिक्षण घेऊन देशासाठी योगदान द्यावे. या करिता संधी व आव्हाने या विषयावर युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण यात्रेचे यवतमाळ जिल्यात युवाशक्ती क्रांतिकारी संघटना वणी नी केले आहे. शिक्षण यात्रेचे यवतमाळ जिल्यात दोन टप्पे असून त्याची पहिल्या टप्यातील सुरुवात आपल्या वणीतून होत आहे.
शिक्षण यात्रेत अॅड.दिपक चटप (ब्रिटीश सरकारची चेव्हनिंग शिष्युवृती प्राप्त करणारा तरुण वकील) अविनाश पोईनकर (कवी, लेखक, मुक्त पत्रकार, ग्रामीण आदिवासी क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक फेलो) व संदीप गोहोकर (शिक्षक तथा प्रतिनिधी युनिव्हर्सल युथ लीडरशिप समेट इंडोनेशिया २०२३) मार्गदर्शन करणार आहेत.
युवकांसाठी शिक्षण यात्रेचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 06, 2024
Rating: