टॉप बातम्या

आज मारेगाव येथे पाच कुंडी महायज्ञाचे आयोजन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त मारेगाव येथे पाचकुंडी महायज्ञाचे सोमवार ला सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आयोजन केले.

शहरातील नगर पंचायत कार्यालयासमोर असलेल्या हनुमान मंदिरात सोमवार दि.22 जाने.ला अयोध्यापतीच्या प्राणप्रतिष्ठा पावन पर्वावर आयोजित महायज्ञास तमाम भाविकांनी सहभाग दर्शविण्याचे आवाहन मारेगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी केले आहे.
Previous Post Next Post