सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : पिसगाव ग्रामपंचायतचे उपसरपंचपदाचा सौ. मिनाक्षी दिगांबर नावडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदाकरिता दि.१३ जानेवारी ला घेण्यात आलेल्या निवडणुकीत सुरज राजू बुटे विजयी झाले.
अडीच वर्षानंतर सौ. मिनाक्षी दिगांबर नावडे यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने पिसगाव येथील उपसरपंचपद रिक्त होते.तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी मारेगाव यांचे घोषित कार्यक्रमानुसार आज शनिवारला पिसगाव ग्रामपंचायत मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सुरज बुटे यांना पाच मते तर, माया गंगाराम रसे यांना चार मते पडली. सरपंच श्रीमती नंदा रवी मेश्राम यांच्या उपस्थितीत अध्यासी अधिकारी नायब तहसीलदार व्ही. डी. मत्ते, तलाठी व्ही.जे.मडावी, सचिव पी. बी. फुलभोगे यांनी कामकाज पहिले. या निवडीबद्दल मान्यवर व ग्रामस्थानी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.