प्रत्येक घराघरांतून पर्यावरणाचं बिजारोपण झाले पाहिजे मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके यांचे प्रतिपादन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील वांजरी लाईम स्टोन खान येथे 10 ते 16 डिसेंबर दरम्यान खान पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलताना प्रदूषणामुळे जनसामान्याच्या आरोग्यावर येणाऱ्या काळातील परिणाम बघता सर्वांनी झाडे लावून निर्सगाचा समतोल राखून पर्यावरणाविषयी, किंबहुना प्रत्येक घराघरांतून पर्यावरणाचं बिजारोपण झाले पाहिजे असे प्रतिपादन मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके यांनी केले.

या कार्यक्रमाला उपस्थित निरीक्षक पथकातील मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके, पिंजरकर साहेब व मस्के साहेब, वांजरी लाईम स्टोनचे मालक अविनाश वारवतकर, वांजरी लाईम स्टोन माईनचे खाण प्रबंधक विंचूरकर, नेट-सिन्हा, ब्लास्टर गजानन किन्हेंकर तसेच वांजरी लाइम स्टोनचे कर्मचारी वेंकटराव अंधेवार, समय्या कोंकटवार, सुनिल कोहळे इतर खाण कामगार उपस्थित होते. पुढे बोलताना, पर्यावरणाचे हे 34 वे वर्ष संपन्न होत आहे असेही म्हणाले. त्यानिमित्त 15 डिसेंबर ला दुपारी 2 वाजता वांजरी लाईम स्टोन खाण येथे पथकातील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या खानीचे निरीक्षण करून उपस्थित कर्मचाऱ्यांना खान पर्यावरण व खनिज संरक्षनाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी खान पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह अंतर्गत, कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित निरीक्षक पथकातील मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके, पिंजरकर साहेब व मस्के साहेब यांचे वांजरी लाईम स्टोन खाणीचे मालक अविनाश वारवतकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

वार्षिक खान पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह दरम्यान निरीक्षक पथकातील मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके, पिंजरकर साहेब व मस्के साहेब यांनी लाईम स्टोन खाणीची यावेळी पाहणी केली. तसेच कंपनीची सर्व कागदपत्रे, रजिस्टर व लेखी अहवालाची तपासणी केली. त्यानंतर तेथील उपस्थित अहवालाची तपासणी केल्यानंतर तेथील उपस्थित कामगारांना पर्यावरण व खनिज संरक्षणासंबंधित माहिती सांगीतली. वांजरी लाईम स्टोन खानीची कामगिरीपाहता मान्यवरांनी कंपनीची आपल्या मनोगतातून मत व्यक्त करताना प्रशंसा केली. 

कार्यक्रमाचे संचालन इंजि.गुलाब गेडाम यांनी केले तर आभार खान प्रबंधक विंचूरकर यांनी मानले. या वार्षिक खान पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह यशस्वीतेकरिता
व्यस्थापक, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
प्रत्येक घराघरांतून पर्यावरणाचं बिजारोपण झाले पाहिजे मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके यांचे प्रतिपादन प्रत्येक घराघरांतून पर्यावरणाचं बिजारोपण झाले पाहिजे   मुख्य अधिकारी स्वप्नील रामटेके यांचे प्रतिपादन Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.