सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शुक्रवारी तालुक्यातील नांदेपेरा येथे घरासमोर खेळत असलेल्या एका अडीच वर्षीय चिमुकली चारचाकी वाहणाखाली आली.या दुर्दैवी अपघातात त्या चिमुकलीचा मृत्यू झाल्या प्रकरणी वणी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी चालकाविरोधात विविध कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश मारोती केमेकर यांची लडकी लेक देविका (अंदाजे वय 2/3) व 3 वर्षाचा एक मुलगा हे दोघेही घराजवळ खेळत होते. दरम्यान, येथीलच प्रज्ज्वल प्रमोद कोल्हे हा महिंद्रा बोलेरो आपले मालवाहू वाहन क्र. (MH 29 T6753) मागे घेत होता. मात्र, वाहन रिव्हर्स घेताना बोलेरोच्या मागच्या चक्याखाली ती बालिका आल्याने या अपघातात तीच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या घरच्यांनी तिला तत्काळ वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले होते.
शुक्रवारी देविका एकाएकी अपघातात मृत्यू पावल्याने केमेकर परिवाराला मोठा धक्का बसला. अखेर मुलीचे वडील प्रकाश याचे भाऊ शंकर यांनी सोमवार दि.25 डिसेंबर ला वणी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाहन चालक प्रज्ज्वल कोल्हे याच्या विरोधात भांदविच्या कलम 279, 304 अ, 134 (अ), 134 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोउनि धिरज गुल्हाने करीत आहे.
गाडीचा रिव्हर्स ठरला चिमुकलीचा काळ, अडीच वर्षीय मुलगी अपघातात ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 26, 2023
Rating: