अखेर त्या शेतकऱ्याने हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावस झाला. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा, ज्वारी, गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे फळबागांचेही नासाडी झाली असून गारपीटमुळे रब्बी पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

तालुक्यातील कासारबेहळ येथील शेतकरी गजानन रामराव करे यांचा शेत सर्वे नंबर 124 मधील अंदाजे दोन एकर मागील झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभऱ्याची मोठी नुकसान झाले होते, त्या पावसामुळे रोग आल्यामुळे व कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे कुठलीही शेतकऱ्याला माहिती, मदत देत नसल्याने हरभरा पिकावर अखेर त्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणून सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात काहीच मदत दिली जात नसल्याचे त्यांनी आरोप करित महसूल व कृषी विभागाने तत्काळ शेतकऱ्याच्या शेतात येऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन करे (कासारबेहळ) यांनी केली आहे.
अखेर त्या शेतकऱ्याने हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला अखेर त्या शेतकऱ्याने हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला Reviewed by सह्याद्री चौफेर on December 07, 2023 Rating: 5
Powered by Blogger.