टॉप बातम्या

खेळासोबतच उद्योग धंद्याची कास धरा- माधव कोहळे

सह्याद्री चौफेर | वृत्सनाथा 

मारेगाव : मानवी जीवनात निरोगी शरीर निर्मिती साठी खेळाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे युवक- विद्यार्थ्यांनी खेळाला जीवनातला अविभाज्य घटक बानवावा सोबतच आर्थिक विकासासाठी सध्या सरकार औद्योगीकरणाला विशेष महत्व देत असुन शेतकरी भुमीपुञ युवकांनी शेतकरी उत्पादन कंपनी सारख्या कंपन्यांची स्थापना करून खेळासोबतच शेतीपुरक उद्योग निर्माण करुन आपल्या आर्थिक उन्नती साठी उद्योग धंद्याची कास धरावी असे प्रतिपादन जय जीजाऊ स्पोर्टींग क्लब वेगाव द्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे यांनी केले.
       
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वेगावच्या सरपंच सौ.उषाताई देरकर ह्या होत्या.यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील देरकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे,मालाताई गौरकर,विठ्ठलराव झाडे,मधुकर टोंगे,हुकेश नांदे,विकास सोनटक्के,भाऊ आसुटकर,भारत गौरकर,आविनाश काकडे इत्यादी उपस्थित होते.
    
कार्यक्रमाचे सुञसंचालन सुनिल किंगरे व आभार प्रदर्शन निखिल काकडे यांनी केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी जितेंद्र गौरकार, संदीप फटाले,प्रशांत गौरकार,सचिन देवाळकर,वैभव देवाळकर,संतोष पिपराडे,साहील बदकी,संतोष फटाले,प्रविण मेश्राम ,प्रतिक टिकले,गिरीश जिवतोडे ,राहुल काकडे,रवि निखाडे,कौशिक गौरकार इत्यादींनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post