सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय, रक्तपेढी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पार पडणार असून या महोत्सवी समाज प्रबोधनात्मक किर्तन दुपारी 12 वाजता ह.प.भ.कांचनाताई शेळके यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
धार्मिक तथा विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून येत्या 1 जाने. ते 5 जानेवारी 2024 या पाच दिवसाच्या महोत्सवी भव्य रक्तदान शिबिरास, भव्य यात्रा महोत्सव यात्रेत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन माजी सदस्य संजयभाऊ निखाडे व संजय निखाडे मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.
विशेष उल्लेखनीय की, या शिबिरात प्रथम 100 रक्तदात्यांना 20 लि. पाण्याची कॅन उपहार स्वरूपात येणार आहे. तसेच ज्यांना या यात्रेत आपल्या प्रतिष्ठान, दुकाने थाटायची असतील त्यांनी समितीच्या सदस्यांकडे संपर्क साधावा अशी माहिती आयोजन समिती कडून देण्यात आली आहे.