सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी नार्थ क्षेत्रामध्ये वेकोली च्या माध्यमातून टेंडर (निविदा) काढून खाजगी कंपनीना टेंडर देण्यात येते, वेकोली व खाजगी मालकाच्या संयुक्तरित्या कामकाज चालवतात. त्याच आधारावर वाहक भरती केल्या जाते. मात्र, ठेकेदारी पद्धतीने टेंडर मालक, खाजगी वाहन चालक शासकीय नियम धाब्यावर ठेवून वाहन चालकाची शारीरिक व मानसिक व आर्थिक पिळवणूक करतात. ह्या विरोधात एकता असोसिएशन मोटार वाहन मदतनीस वेलफेयर तर्फे दिनांक 28 डिसेंबर ला क्षेत्रीय प्रबंधक वेकोली वणी नॉर्थ व सर्व ट्रॅव्हल्स एजेन्सी च्या विरोधात कामबंध आंदोलन करण्यात आले.
त्याठिकाणी वाहनचालकांच्या नैतिक मागण्या प्रशासना समक्ष ठेवण्यात आल्या,त्यामधते प्रामुख्याने पूर्ण मागण्या अवघ्या दोन ते तीन तासात मान्य केल्या त्या पुढील प्रमाणे, 1) वाहन चालक यांना NIT च्या तत्वावर वाहन चालवीत फक्त 8/12 करण्यात येणार. 2) वर्क ऑर्डर प्रमाणे जे मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येईल. 3) मासिक वेतन प्रति महिना 10 तारखेलाच देण्यात येणार. 4) 26 दिवसाचे काम करण्यात येणार व मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येणार. 5) पि. एफ. व पगार पत्र प्रत्येक महिण्यात लिखित स्वरूपात देण्यात येणार.
ह्या सर्व मागण्याबैठकी अंती वेकोली व ट्रॅव्हल्स एजन्सी मार्फत लेखी आश्वासन देऊन काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय देरकर, वेकोली क्षेत्रीय प्रबंधक यु. सी. गुप्ताजी, उदय कुमार नोडल अधिकारी वणी नॉर्थ, संजय देठे, डॉ.जगन जुनघरी, वसंता डुकरे, फैजल बशीर खान, प्रवीण खानझोडे यासह संघटनेचे पदाधिकारी विजय सिंग, आकाश गौतम, राकेश वरारकर, रजिक शेख, जतींदर सिंग, राजू चिंचोलकर, फारुख पठाण, राजू यादव, चंदन हिकरे, प्रशांत मिलमीले, विलास मंदे, विशाल राऊत, नवरतन भावरकर व शेकडो वाहन चालक तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय देरकर यांच्या नेतृत्वात वेकोली वाहन चालकाच्या समस्या निकाली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 30, 2023
Rating: