मारेगाव पदाधिकाऱ्यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील विविध समस्या, प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे या मागण्या मार्गी लावण्यात याव्या अशा आशयचे निवेदन मारेगाव तालुका भाजपच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले.

जिल्ह्यासह अनेक तालुक्यातील एमआयडीसी (MIDC) च्या या जागेवर छोटे-छोटे उद्योग सुरु झाले. मात्र, मारेगावात याकडे पाठफिरविली जात आहे. परंतु शहरात एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास निश्चीतच तालुक्यातील बेरोजगारी कमी होईल अशा आशयचे निवेदन मारेगाव तालुका भाजप च्या वतीने उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. गेल्या 30 वर्षांपासून एमआयडीसी (MIDC) ची जागा मोकळीस पडली असून याठिकाणी शहराचा विस्तार पाहता, आता अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील एमआयडीसी (MIDC) नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचा सतत प्रयत्न करित आहे. मात्र, मारेगाव हा उद्योगाच्या स्पर्धेत मागे राहिला आहे. त्यामुळे "मारेगाव तालुका" हा आदिवासी बहुल असं आता नावालाच म्हटलं जात आहे.

तसेच तालुक्यात 132 केव्ही विद्युत उपकेंद्र, शहरात प्रवाशांना नियोजित जागेवर बस स्थानक उभारणी होणे आवश्यक आहे. त्या करिता भरीव निधी उपलब्ध करून तालुक्यातील प्रवाश्यांची होणारी हेळसांड थांबवावी व मारेगाव तालुक्यात 132 केव्ही विद्युत उपकेंद्र तत्काळ मंजूर करून तालुक्याची रोजची विजेची कटकट थांबाबवी अशी भाजप पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. तालुक्यातील 132 विद्युत उपकेंद्र, बस स्थानक व एमआयडीसी या प्रमुख मागण्या मार्गी लावण्यासाठी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकमुखी मागणीचे निवेदन नागपूर येथे भेट घेऊन देण्यात आले आहे. यावेळी मारेगाव तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Previous Post Next Post