कृषी प्रधान देशात आजही सोयाबीन, कपाशीचे भाव दहा वर्षांपूर्वीचेच


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : या वर्षाला उत्पन्नापेक्षा लागवडीला खर्च जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी डबघाईस आले असून शेतकऱ्यांची ही दिवाळी अंधारात गेली आहे.
यावर्षी पाऊस उशिरा आला. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर जून महिन्याच्या अखेर तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला कपाशीच्या टोबण्या तर सोयाबीनच्या पेरण्या झाल्या. सुरुवातील सोयाबीन चे उत्पन्न चांगले होईल असे दिसून येत होते, परंतु उतारा आल्यानंतर शेतकऱ्यांचे पूर्ण गणितच बिघडले ऐका थैलीला चार ते पाच क्विंटलचे उत्पन्न झाले.
त्यात भाव ही कमी असल्याने शेतकऱ्याने कंबरडे मोडले आहे. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. भरकाड जमिनीवरील कपाशी एका वेचणीत उलंगवाडी होत आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असून शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. सुरू असलेल्या हंगामात कापसाला सात हजार रुपये की. केवळ भाव मिळत आहे.
आता प्रत्येक शेतात जास्त बोंडे फुटली आहे. त्यामुळे फुटलेला पूर्वी कापूस वेचणी दैनंदिन ते अकरापासून पाच वाजेपर्यंत करायचे. आता मात्र मजूर मिळत नसल्याने भल्या पहाटे कापूस वेचणी सुरू होते. सिलिंडर हजार रुपये, तेल सव्वाशे रुपये, साखर चाळीस रुपयाच्या पार झाली आहे.

मात्र सोयाबीन, कपाशीचे भाव दहा वर्षांपूर्वीचेच आहे. यात फारसा फरक पडला नाही. कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांचीच थट्टा सुरू आहे. शासनाची कापूस खरेदी सुरू करुन हमीभावात सरसकट कापूस खरेदी करण्यात यावी. कापसाला किमान दहा हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कापूस झाडावर तरी किती दिवस ठेवणार असा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांनी कापूस वेचून सुरू केली आहे. त्यातच वेचणीला ही मजूर मिळेनासे झाले आहे.
कृषी प्रधान देशात आजही सोयाबीन, कपाशीचे भाव दहा वर्षांपूर्वीचेच कृषी प्रधान देशात आजही सोयाबीन, कपाशीचे भाव दहा वर्षांपूर्वीचेच Reviewed by सह्याद्री चौफेर on November 19, 2023 Rating: 5
Powered by Blogger.