अनधिकृत फटाक्यांच्या दुकानावर महसूल विभागाची धडक कारवाई, दुकाने व गोडाऊन सील

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील फटाखा होलसेलर पालकर यांच्या वसंतगंगा विहार, गांधी चौक येथील कुल्दीवार, व सर्वोदय चौकातील नागपुरे यांच्या फटाक्यांच्या दुकानावर महसूल विभागाने धडक कारवाई करित गोडाऊन सुद्धा सील केल्याने फटाखा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
शहरातील लोकवस्त्यांमध्ये व निवासस्थानांमध्ये फटाक्यांची दुकाने लावून सर्रास फटाक्यांची विक्री केली जाते. मात्र, नियमबाह्य पद्धतीने फटाक्याचे दुकान लावण्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी नगर परिषदचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती.
त्यानुषंगाने नायब तहसीलदार रविंद्र कापशीकर यांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या पथकाने शहरातील फटाका दुकानांचे निरीक्षण करून अवैध फटाका दुकानांवर धडक कार्यवाही करीत फटाक्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच अवैध फटाक्यांची दुकाने व गोदामही महसूल विभागाने सील केले आहे. यात होलसेलर पालकर यांच्या वसंतगंगा विहार येथील गोडाऊन, गांधी चौक येथील कुल्दीवार, व सर्वोदय चौकातील नागपुरे यांच्या अनधिकृत फटाक्यांचे दुकान सील केली.
विशेष म्हणजे,दिवाळीच्या पर्वावर प्रशासनाकडून फटका व्यापाऱ्यांना फटका विक्री परवान्यांचे नूतनीकरण करून दिले जाते. फटाक्याची दुकाने लावण्याकरिता फटका विक्रीचा परवाना असणे आवश्यक असते. दिवाळी निमित्त फटाक्यांची दुकाने लावण्याकरिता व्यापाऱ्यांना नगर पालिकेकडून भाडे तत्वावर जागा देखिल उपलब्ध करून दिली जाते.
परंतु शहरात काही ठिकाणी अवैधरित्या फटाक्यांची दुकाने लावली लावली जातात. अशा आढळून आलेल्या अनधिकृत दुकान, व्यवसाय करणाऱ्यावर महसूल विभागाने कारवाई चा बडगा उगारला असून आणखी निरीक्षण करण्याची अपेक्षा या कारवाई ने शहरवासियांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
अनधिकृत फटाक्यांच्या दुकानावर महसूल विभागाची धडक कारवाई, दुकाने व गोडाऊन सील अनधिकृत फटाक्यांच्या दुकानावर महसूल विभागाची धडक कारवाई, दुकाने व गोडाऊन सील Reviewed by सह्याद्री चौफेर on November 22, 2023 Rating: 5
Powered by Blogger.