सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
आजचे युग कॉम्प्युटचे आहे. घरापासून ऑफिसपर्यंत सर्व कामे कॉम्प्युटरच्या माध्यमातून होत आहेत. अशा परिस्थितीत कॉम्प्युटर क्षेत्रातील करिअरबद्दल बोलायचे झाले तर मग ती सरकारी नोकरी असो वा खासगी, कॉम्प्युटरचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.
जर तुम्ही खालील कोर्स केले, तर चांगल्या नोकरीबरोबरच तुम्हाला पगार देखील चांगला मिळेल.
व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन कोर्स:
तुमच्याकडे क्रिएटिव्हीटी असेल आणि कॉम्प्युटर शिकण्याची इच्छा असेल, तर व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन हा एक चांगला कोर्स असू शकतो. आजच्या काळात ॲनिमेशन प्रोफेशनल्स आणि आर्टिस्टला खूप मागणी आहे. आजकाल चित्रपटही ॲनिमेशन बनवले जात आहेत. जिथे चित्रपट उद्योगात ॲनिमेशन आर्टिस्ट आणि प्रोफेशनल्स यांना खूप मागणी आहे. या कोर्सनंतर चित्रपटसृष्टीत सहज नोकरी मिळू शकते. 'कोर्स टाईम' शॉर्ट टर्म कोर्स 5 महिन्यांचा आहे तर डिप्लोमा 3 वर्षांचा आहे.
वेब डिझायनिंग :
नोकरीच्या दृष्टीने हा सर्वोत्तम कोर्स मानला जातो. हे केल्यानंतर, तुम्हाला मल्टीनेशनल कंपन्यांमध्ये थेट ऑफर मिळू शकतात. बाजारात वेब डिझायनर्सना खूप मागणी आहे. या कोर्समध्ये JavaScript, PHP, HTML इत्यादी कोडिंग भाषांचा अभ्यास समाविष्ट आहे.
'कोर्स टाईम' वेब डिझायनिंग कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा आहे ज्यामध्ये शॉर्ट टर्म 3 ते 6 महिने आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचे काम सुरू करू शकता किंवा कोणत्याही कंपनीत काम करू शकता.
टॅली कोर्स :
टॅली तज्ज्ञांच्या डिमांडमुळे टॅली कोर्सलाही मोठी मागणी आहे. हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही संस्थेतून शिकण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते ऑनलाइन देखील शिकू शकता.
'कोर्स टाईम' या कोर्स चा कालावधी 3 ते 4 महिन्यांचा आहे.
डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स:
यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अनेक नामांकित महाविद्यालये आणि संस्था हा कॉम्प्युटर सायन्स कोर्स देतात. हे केल्यानंतर तुम्हाला नोकरीचे चांगले पॅकेजही मिळू शकते.
IT डिप्लोमा:
आयटी (IT) डिप्लोमा हा 12 वी नंतरचा सर्वोत्तम कॉम्प्युटर कोर्स आहे. हा कोर्स यूजफुल आणि व्हॅल्यूएबल असून त्याचा कालावधीही मोठा आहे. आपले करिअर योग्य दिशेने घेऊन आपण कॉम्प्युटर क्षेत्रात मास्टर बनू शकता.
'कोर्स टाईम' या कोर्सचा कालावधी 3 वर्षांचा आहे.
हे कॉम्प्युटर कोर्स केले तर तुमचे करिअर होईल सेट, मिळेल लाखोंचे पॅकेज..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 20, 2023
Rating: