भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कपडे, फळ, फराळ वितरण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राळेगाव : आदिवासी समाजातील शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढणारे महान क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती (१५ नोव्हेंबर) साजरी करण्यात आली. या निमित्ताने राळेगाव येथील श्री गोपाल आडे यांच्या वतीने गोरगरीब आणि गरजू बंधुभगिनींना कपडे, फळ आणि फराळ वाटप करण्यात आला.

यावेळी आडे यांनी भाषणात बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, बिरसा मुंडा यांनी सेठ, सावकार, जमीनदार, ठेकेदार, पुरोहित, अधिकारी, मालगुंजार, व्यापारी आणि दिकू (इंग्रज) यांच्याकडून होणाऱ्या शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले.

श्री आडे म्हणाले की, बिरसा मुंडा यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे "अबू राज ऐ ते जान, महाराणी राज तुंडू जन" हे नारे आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांनी सुरू केलेले "उलगुलान" हे आंदोलन आपण सर्वांनी पुढे चालवले पाहिजे.

आजच्या या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी बिरसा मुंडा यांचे कार्य आणि विचार डोळ्यासमोर ठेवून आपल्या समाजातील शोषण आणि अन्यायाविरुद्ध लढा द्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी आडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.