टॉप बातम्या

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; वाढलेली धोकादायक झाडे, झूडुपे देताहेत अपघातास निमंत्रण

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाढलेली झुडपे मृत्यूचे सापळे बनले असल्याने या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशी संताप व्यक्त करित आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी-नांदेपेरा-मार्डी मार्गांवरील बहुतांशी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपामुळे रस्ते अरुंद होत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कसरतीत अनेकवेळा अपघात ही घडले आहेत तर काही जणांना जीवाला मुकावे लागले आहे. असे असतानाही या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या वातावरणात बदल होत असल्याने वळणावरील काही रस्त्यावर मोठी धोकादायक ही काटेरी झूडुप,झाडे समोरून येणाऱ्या वाहणाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वळण घेतांना वाहनधारकांना धाकधूकीत वाहतूक करावी लागत असून नांदेपेरा - वनोजा देवी मार्गांवरील कडेला वाढलेली काटेरी झुडपे ही वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. या गंभीर विषयाकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाश्यातून बोलले जात आहे. 
Previous Post Next Post