टॉप बातम्या

सावर्ला जवळ आढळून आला मृतदेह, पोलिसांनी ओळख पाठविण्यासाठी केले आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीत 21 ऑक्टोंबर रोजी रात्री 6 वाजेच्या दरम्यान वणी-वरोरा महामार्गावरील सावर्ला पुल नजीक एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. हा अपघात की घातपात याबाबत अजून तरी माहिती समोर आली नसून पोलीस अधिक तपास करत आहे. 

दरम्यान, वणी पोलिस स्टेशनचे जमादार गजानन होडगीर हे घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह उत्तरीय तपासणी करिता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून उंची 5 फुट आहे. मृतकाच्या अंगात काळा फिकट रंगाचा पॅन्ट घातलेला आहे. तर उजव्या हातात राखीचा धागा बांधलेला आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी वणी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.


Previous Post Next Post