साथीच्या आजारांमुळे बोगस डॉक्टरांची चांदी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सध्या परिसरामध्ये साधींच्या आजाराने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. गावखेड्यात रुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे याचा फायदा गावाखेड्यातील बोगस डॉक्टरांनी घेतला असून उपचाचाराच्या नावाखाली रुग्णाच्या जीविताशी खेळ सुरू आहे.

ग्रामीण भागामध्ये तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. टायफाईड, डेंग्यू, मलेरिया सदृश्य आदी विविध प्रकारच्या आजाराने डोकं वर काढले आहे. मारेगाव शहरा सह ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया सदृश्य चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणा आरोग्य सुविधा पुरेशी नसल्याने गावखेड्यातील बिना परवाना, बिना डिग्री व कुठलेही आरोग्य विषयक ज्ञान नसलेल्या बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावले आहे. अनेक वेळा वापर रुग्णांवर नको ते उपचार करून, आवश्यकता नसताना केवळ पैशाच्या हव्यासापोटी सलाईनचा आग्रह रुणांच्या जीवावर बेतणार ठरतो आहे.

ग्रामीण भागामध्ये रक्त नमुने तपासणी प्रयोगशाळा किंवा आवश्यक तपासण्यांसाठी तंत्रज्ञ उपलब्ध नसताना केवळ अंदाजे लक्षणांवर उपचार केला जातो. त्यातही मोठ्या प्रमाणावर स्टेॉईडसारख्या दर्जाहीन औषधांचा वापर करण्यात येतो. बरेच डॉक्टर शहरातील औषधालयातून कमी किमतीच्या दर्जाहीन औषधी स्वतःच खरेदी करून आणतात. रुग्णांना वारेमाप किमतीत स्वतः च लुटत असतात, केवळ आर्थिक हाव्यासपोटी होत आहे. याचा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंध येत आहे. यावर शासकीय आरोग्य यंत्रणेने लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रत्येक ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा शोध घेणारी एक समिती कार्यान्वित आहे. असे असूनही नागरिकांच्या जीवितांशी खुलेआम दवाखाने थाटून आर्थिक लूट करण्याचा प्रकार करण्यात येत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याने बोगस बंगाली डॉक्टरांची चांदी आहे. यावर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व संबंधित यंत्रणा लगाम लावेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


शासकीय रुग्णसेवा खेडोपाडी पोचविली

अशिक्षित जनता अशा डॉक्टरांवर मोठा विश्वास संपादन करून उपचार घेत आहेत. कमी खर्चात उपचार होत असल्याने असे रुग्ण अधिकृत दवाखान्यात महागडे उपचार नको म्हणून गावातच, सेवा देणाऱ्या थापाड्या डॉक्टराकडे आपला मोर्चा वळवत असल्याचे दिसून येत आहे. भगंदर, मूळव्याध यासह अनेक गुप्त आजारांवर हमखास उपचाराची हमी देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी बंगाली डॉक्टर रुग्णांची आर्थिक लुट करत आहेत. अनेकदा डॉक्टरांकडून व जीवाशी थेट संबंध येत आहे. अनेकदा झोलाछाप डॉक्टराकडून चुकीचा उपचार झाल्याने त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे  अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. तरीही सदरील रुग्ण लेखी तक्रार देण्यास धजावत नसल्याने बोगस डॉक्टरांना रान मोकळे झाले आहे. अशा बोगस डॉक्टरांच्या जाळ्यात पडू नये, म्हणून शासनाने ग्रामीण भागात रुग्ण सेवा खेडपाडी पोहचवली आहे.


साथीच्या आजारांमुळे बोगस डॉक्टरांची चांदी साथीच्या आजारांमुळे बोगस डॉक्टरांची चांदी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.