शांतता समितीची बैठक वणी पोलीस स्टेशन मध्ये संपन्न

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : 13 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजता वणी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. 15 ऑक्टोंबरपासून नवरात्री उत्सव  प्रारंभ होत आहे. त्यानंतर धम्मचक्र परिवर्तन दिन, दसरा, हे सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी शांतता समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष  उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत ठाणेदार अजित जाधव, वाहतूक शाखेच्या सपोनी सीता वाघमारे, ए.पिआय.दत्ता पेंडकर हे उपस्थित होते.

यावेळी शांतता कमेटीच्या सदस्यांनी येणाऱ्या सणात वणी शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी काही सुचना केल्या, त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांनी शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही.यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असणार आहे. शहरात शांतता भंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाईल असे आवाहन केले.

ठाणेदार अजित जाधव यांनी सांगितले की न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार मंडळांनी पालन करावे जेणेकरून वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या सपोनि सिता वाघमारे यांनी स्त्रियांना दागिण्यासंदर्भात काही मार्गदर्शन केले.

सभेचे सूत्र संचालन ठाणेदार अजित जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाहतूक शाखेच्या सपोनि सिता वाघमारे यांनी केले.यावेळी शांतता समीतीचे सभासद, पत्रकार व दुर्गाउत्सव मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक उपनिरीक्षक शेखर वांढरे, आत्राम यांच्या सह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
शांतता समितीची बैठक वणी पोलीस स्टेशन मध्ये संपन्न शांतता समितीची बैठक वणी पोलीस स्टेशन मध्ये संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 14, 2023 Rating: 5
Powered by Blogger.