सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
निवेदनात असेही नमूद केले आहे की,नागरिक २०२२ ते २०२३ पर्यंतचे ८० टक्के ते ९० टक्के नागरिक गृहकर, पाणीकर, विदयुत कर, आरोग्य कर, गृहकर व इतर संपूर्ण कर इंदिराग्राम ग्रामपंचायतला भरले असताना आज विदयुत लाईन खंडित झाल्यामुळे गावाकऱ्यांना पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
त्यामुळे गावातील लोकांना नाल्यातून पिण्याचे पाणी नाल्यातून आणावे लागत आहे. हे पाणी दुषित असल्यामुळे नागरिकांना ताप, हिवताप, मलेरिया, डेंगू, मलेरिया व इतर रोगांची दुषित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. याबाबत ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. अशी तक्रार निवेदनातून केली असून गावाकऱ्यांना पोळ्या सारखा सण अंधारात करावा लागला आहे.
नागरिकांनी वारंवार मागणी केली मात्र, सचिव,सरपंचांनी नागरिकांना "तुम्ही संपूर्ण गृहकर भरल्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही" या भाषेत सांगतात. असे निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे गारगोटी पोड (इंदिराग्राम) मध्ये किती गृहकर भरले व शिल्लक आहे. त्याची संपूर्ण माहिती ग्रामपंचायत कार्यालयाने जाहिर करावी. तसेच पंचायत समिती स्तरावरून याची सखोल चौकशी करून गावाकऱ्यांना तत्काळ पाण्याची समस्या दूर करण्यात यावी. पाण्याची समस्या न मिटल्यास अन्यथा उपोषण किंवा आंदोलन करण्यात येईल. असा गर्भीत ईशाराही नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून गट विकास अधिकारी, मारेगाव यांना देण्यात आला आहे.
पाणी प्रश्न पेटला, इंदिराग्राम येथील महिला धडकल्या पंचायत समितीवर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2023
Rating:
