सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आदिवासी जमातीमध्ये गैर आदिवासीना समाविष्ट करू नये, असे केल्यास हा आदिवासी समाजावर वर अन्याय आहे, हा अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही, यासाठी आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने भव्य मोर्चा (ता.3) रोजी मारेगाव तहसील वर धडकला, या विराट मोर्चाने अख्या तालुक्यासह स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले.
3 ऑक्टोबर मंगळवार ला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथून दुपारी 2 वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला. शहरातील मुख्यमार्गांवरून हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. या आक्रोश मोर्चातून धनगर समाज गैरआदिवासी असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीच्या यादी मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, आदिवासीची विविध क्षेत्रातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे, पेसा कायदा अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावा, इत्यादी मागण्याचे निवेदन तहसीदार उत्तम निलावाड यांना देण्यात आले. या मोर्चात बहुतेक सर्वच राजकीय पक्षातील आदिवासी बांधवानी सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला होता.
शामदादा कोलाम संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष लेतूजी जुनगरी, संविधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बळवंत मडावी, बिरसा ब्रिगेडचे डॉ. अरविंद कुळमेथे, यांनी या आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन केले. आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली, सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम विद्यमान सरकार करित असल्याने आदिवासी विरोधी शिंदे सरकारचा निषेध आणि धनगर समाजाला आदिवासीत समाविष्ट करू नये, असे दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
या वेळी वणी झरी मारेगाव सर्व विविध राजकीय क्षेत्रातील नेते व मारेगाव तालुक्यातील महिला पुरुष, युवक युवतती शेतकरी, कष्टकरी, जेष्ठ नागरिक मंडळीनी उत्स्फूर्तपणे मोर्चात मोठया संख्येनी सहभागी झाले होते. या प्रसंगी उपस्थित सामाजिक राजकीय मान्यवरांनी मध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आता यापेक्षाही मोठी लढाई आदिवासीच्या विरोधात असणाऱ्या सरकारच्या विरोधात एकजुटीने लढायची आहे...
मारेगाव तहसीलवर धडकला आदिवासिंचा आक्रोश मोर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2023
Rating:
