सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मारेगाव तालुक्यातील अर्जुनी या गावाची निवड केली आहे. अर्जुनी गाव दत्तक घेतल्याने शासनाच्या संपूर्ण योजना या गावात राबविल्या जाणार आहेत.
वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालं, व होतही आहे. विकासात्मक धोरण जोपासून वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे. विकसनशील व जनहितार्थ कामे हाती घेऊन त्यांनी ती पूर्णत्वास आणली. शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासालाही त्यांनी तेवढीच प्राथमिकता दिली.
विकास कामाला प्राध्यान देत शासनाच्या निर्णयानुसार आमदार बोदकुरवार यांनी मारेगाव तालुक्यातील अर्जुनी या गावाची आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड केली आहे. त्यामुळे या गावात शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजना राबविल्या जाणार आहेत. लवकरच त्याचा कृती आराखडा तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अर्जुनी गावाची निवड केल्याने व दर महिन्याला या ठिकाणी भेट देण्यात येणार असल्याचे भाजपा जिल्हा सचिव शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश लांबट, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, मारोती तुराणकर, मालाताई गैरकार, शालिनी ताई दारुंडेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले. याशिवाय संपूर्ण अर्जुनीवासीयांनी त्यांचे कौतूक केले आहे.
सरपंच उपसरपंच व सदस्य तथा नागरिकांचा भाजपात प्रवेश :
सरपंच सौ वंदना आत्राम, उपसरपंच जयदीप लोडे, ग्राम पंचायत सदस्य गुलाब आत्राम, प्रमोद आत्राम,अनिल आत्राम, सचिन इंगोले, प्रल्हाद कनाके, स्वप्नील कडू,विठ्ठल तोडासे, वाघू आत्राम, प्रतिष कुळमेथे, मनोज नेहारे, बेबी आत्राम, नयना कुळमेथे, रामा मेश्राम, कल्पना आत्राम, गणेश मेश्राम, संजय कुळमेथे, श्रीराम कुळसंगे,किसन नेहारे, मारोती मडावी आदींचा समावेश आहे. या प्रसंगी आमदार बोदकुरवार म्हणाले की, दर महिन्याला गावात व्हिजिट असणार आहे, या भेटीतून गावाची समस्या गावाच्या विकासाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच यंदा माझ्या आदिवासी बांधावासोबत भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. सर्वांचे पक्षात स्वागत व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
अर्जुनी हे गाव आमदार बोदकुरवार यांनी घेतले दत्तक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2023
Rating: